सुनील रजक, प्रतिनिधी
शिवपुरी, 25 मे : मध्यप्रदेश मधील शिवपुरी येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये एका तरुणीला आजारी असल्यामुळे दाखल करण्यात आले होते. मात्र, ती तरुणी बेडवरून उठली आणि हॉस्पिटलच्या आवारात जाऊन रामनामाचा जप करू लागली. यानंतर नातेवाईकही तरुणीकडे पोहोचले आणि तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागले. हे सर्व पाहून एकच गोंधळ उडाला. त्याचवेळी डॉक्टर मुलीवर योग्य उपचार करत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे तिच्या डोक्यात ताप गेला आहे.
इंदूर येथील रहिवासी असलेल्या अंजली कुशवाह आणि वडील दौलतराम कुशवाह यांना एक दिवसापूर्वीच ताप आल्याने जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल असलेली अंजली अचानक बेडवरून उठून हॉस्पिटलच्या आवारात पोहोचली आणि ती रामनामाचा जप करत बसली होती.
अचानक हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या हनुमान मंदिरात पोहोचल्यावर अंजली गोंधळ घालू लागली, त्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्याने तिच्यावर गंगाजलही शिंपडले. त्यानंतर हा हायव्होल्टेज ड्रामा अनेक तास सुरू राहिल्याने हॉस्पिटलच्या परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. हा सर्व प्रकार पाहून रूग्णाचे नातेवाईक संतप्त झाले आणि त्यांनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत रूग्णाला घरी नेण्यास सांगत असल्याचे सांगितले. योग्य उपचार होत नाहीत. त्यामुळे ताप तिच्या डोक्यात गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.