मुंबई (शुभम), 11 मे : हिंदू धर्मात पूजा-पाठ, जप-विधी यांना खूप महत्त्व आहे. ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. दरम्यान पुजा पाठ करण्यासाठी अनेक साहित्य वापरले जाते. यातील हळद हे त्यापैकीच एक महत्वाचे मानले जाते. हिंदू धर्मात हळद अतिशय शुभ मानली जाते. हळदीचा उपयोग शुभ कार्यात केला जातो. हळदीशिवाय विधी अपूर्ण मानले जातात. हळदीचा वापर घरच्या पूजेपासून, लग्नापर्यंत सगळ्याच बाबतीत महत्वाची मानली जाते.
हळदीला ज्योतिषशास्त्रात सकारात्मकतेचे प्रतीक मानले गेले आहे. ज्योतिषशास्त्राव्यतिरिक्त विज्ञानानेही हळदीची उपयुक्तता ओळखली आहे. हळदीचे अनेक आरोग्य फायदेही आहेत. ज्योतिषशास्त्रात हळदीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करण्याचे फायदे सांगितले आहेत. यापैकी एक म्हणजे हळदीच्या पाण्याने स्नान करणे. ज्योतिष शास्त्रानुसार आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात. चला आम्ही तुम्हाला पाण्यात हळद घालून अंघोळ करण्याचे फायदे सांगत आहोत.
OMG! बकरीने दिला अशा पिल्लाला जन्म की पाहण्यासाठी लोकांची गर्दी; VIDEO जगभर व्हायरल
1) आंघोळीच्या पाण्यात हळद मिसळल्याने नकारात्मकता दूर होते, असा ज्योतिषशास्त्राचा विश्वास आहे. यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा पसरते. हळद मन शुद्ध करते आणि जीवनात चांगले गोष्टी मिळण्यास प्रोत्साहन मिळते.
2) हळदीचा संबंध गुरूशी आहे. म्हणूनच ते अत्यंत पवित्र मानले जाते. जर एखाद्याच्या कुंडलीत गुरु कमजोर असेल तर हा उपाय नियमित करावा. यामुळे गुरुचे दोष दूर होतील. या उपायाने गणपतीची कृपा देखील प्राप्त होते.
3) जर कोणाचे लग्न होत नसेल, वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील, लग्न जुळून आल्यावर तुटत असेल तर त्यानी हळदीचा वापर करावा. हा उपाय रोज केल्यास वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. जर तुम्ही हा उपाय नियमित करू शकत नसाल तर गुरुवारी नक्कीच करा.
4) हळद हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच लग्नांमध्येही हळदीचा वेगळा विधी केला जातो. असे मानले जाते की ते वाईट नजरेपासून संरक्षण हळद करत असते. रोज पाण्यात हळद टाकून आंघोळ केल्याने घरात समृद्धी येते.
चमत्कार झाला! जगातील पहिला Super Baby जन्माला आला; आहे खास पॉवर
5) हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. हळदीच्या पाण्याने नियमित आंघोळ केल्याने मुरुमे आणि डागांची समस्या दूर होते. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. तथापि, जर तुम्हाला त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर ते वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(या लेखात दिलेली माहिती सामान्य समजुतींवर आधारित आहे. News18 lokmat याची पुष्टी करत नाही)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.