पुणे, 8 एप्रिल : अजित पवार काल सांयकाळपासून नॉटरिचेबल होते. त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र अखेर अजित पवार हे पुन्हा एकदा समोर आले आहेत. त्यांनी खराडीमधील रांका ज्वेलर्सच्या उद्घाटनाला हजेरी लावली. यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील उपस्थित आहेत. अजित पवार यांच्या हस्ते रांका ज्वेलर्ससचं उद्घाटन होणार आहे.
दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वी केलेल्या ट्विटमुळे खळबळ उडाली होती. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सकाळच्या शपथविधीचा फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे अजित पवार नॉटरिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अखेर अजित पवार पुण्यात पत्नीसोबत रांका ज्वेलर्सच्या दुकानात दिसले.
तुमच्या शहरातून (पुणे)
काय होतं अजंली दमानियांचं ट्विट
2019 मध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून सरकार स्थापन केलं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. हे सरकार अल्पकाळ टिकलं आणि त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवेळचा एक फोटो दमानिया यांनी ट्विट केला आहे. ‘मी पुन्हा येईन, किसळवाणी राजकारण’ असं कॅप्शन त्यांनी आपल्या या फोटोला दिलं आहे. दमानिया यांच्या ट्विटमुळे आता राजकीय वतृळात चर्चेला उधाण आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.