नितीन नांदूरकर, प्रतिनिधी
जळगाव, 18 एप्रिल : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल चर्चांना ऊत आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार मुंबईत दाखल झाले आहे. या सगळ्या गोंधळात शिवसेना शिंदे गटामध्ये नेमकं चाललंय काय अशी चर्चा रंगली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ढगाळ वातावरण आहे. राष्ट्रवादीत भूकंपच नाही तर महाभूकंप होणार आहे. भाजप शिवसेनेच्या वातावरणात राष्ट्रवादी पक्ष एकरूप होईल, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडणार या नुसत्या चर्चा नसून अजित पवारांचे पक्षांतर हे अटळ असल्याचे मोठे विधान मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
राष्ट्रवादीमध्ये ढगाळ वातावरण असून भूकंपच नाही तर महाभूकंप होणार आहे. भाजप शिवसेनेच्या वातावरणात राष्ट्रवादी पक्ष एकरूप होईल, या चर्चेमध्ये तथ्य असल्याचा दावाही गुलाबराव पाटलांनी केला आहे.
शरद पवारांनी जरी म्हटलं असेल की, या नुसत्या चर्चा आहेत. मात्र शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध घडत असतं असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.
शरद पवारांनी नाकारली अजितदादांची बातमी!
दरम्यान, अजित पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. जी काही चर्चा तुमच्या मनात आहे ती आमच्या मनात अजिबात नाही. कुणीतरी बातम्या पिकवतय यापेक्षा त्याला अधिक काही महत्व नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
(अजित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे भडकल्या, नेमकं काय म्हणाल्या?)
शरद पवार म्हणाले की, मी आणि माझे सहकारी हे सगळे एक विचाराने राष्ट्रवादी कॅाग्रेस अधिक शक्तीशाली कसा करता येईल यासाठी काम करतोय. दुसरा कुठलाही विचार कुणाच्याही मनात नाही. याच्यानंतर माझा देहूला कार्यक्रम आहे. तिथून मी मुंबईला जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं.
(मी अध्यक्ष म्हणून सांगतोय, अजितदादांच्या चर्चांवर पहिल्यांदाच शरद पवार बोलले; म्हणाले….)
मी वर्तमानपत्रात वाचल काहीतरी बैठक बोलवलीय पण मी अशी कुठलीही बैठक बोलवली नाही. आमचे प्रांताध्यक्ष त्यांच्या गावाला आहेत. तिथे मार्केट कमिटीच्या निवडणुका आहेत. तर अजित पवार त्यांच्या कामात आहेत. मार्गदर्शन करताहेत त्याशिवाय इतर कुणावरही ही जबाबदारी नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.