चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 12 एप्रिल : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 15 आमदारांना घेऊन बाहेर पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण, ‘नक्की राज्यात काय चाललंय आम्हलाच कळत नाही,अनेक जुमले सुरू आहेत. एक्सपोर्ट कमी झालं आहे, अनेक प्रश्न आहेत राज्यात पण गॉसिपला मला वेळ नाही, मला गलिच्छ राजकारण आवडत नाही’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
तुमच्या शहरातून (पुणे)
अजित पवार यांच्या बंडखोरीच्या बातम्यांचा पूर आला आहे. पण, राष्ट्रवादी आणि अजितदादांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. या सगळ्या चर्चांवर सुप्रिया सुळेंनी आपली प्रतिक्रिया दिली.
‘शरद पवार याची बदनामी कोण करतंय माहिती नाही. पण आपलं नाणं 55 वर्ष टिकलं हेच समाधान आहे. देशात दडपशाही आहे पण इतकी नाही एखादी महिला बोलू शकते. मला गॉसिप करण्यासाठी वेळ घालवत नाही. लोकसभेची जबाबदारी मोठी असते. त्यामुळे अनेक काम आहेत त्यात बारामती काम करायला वेळ पुरत नाही. पवार साहेब याच्या विरोधात षडयंत्र सुरू आहे. असाच याचा अर्थ आहे, आमचं नाण चालतंय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
(महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर? 20 आमदार बंडाच्या तयारीत!)
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक झाली. या बैठकीत नेहमीची चर्चा झाली. मुळात चर्चा झाली पाहिजे, चर्चा नाही झाली तर त्याला दडपशाही म्हणतात. इतकी टोकाची भूमिका वाटतेय. त्यामुळे मविआमध्ये काहीही वाद नाही. मविआचं काम चालू आहे. बातम्यात व्हिडीओ एक दाखवतात आणि चालतं तिसरच, असंही सुळे म्हणाल्या.
(मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, अजितदादा शिंदे-फडणवीसांच्या भेटीला, राणेही पोहोचले, पण..)
केंद्रात वन ऑफ द बेस्ट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहे. तर जयशंकर कामाच्या बाबतीत बेस्ट आहे. चांगलं काम केलं तर थँक्स बोललं पाहिजे, गडकरी यांचं कौतुक आहे, असं म्हणत सुळे यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.