चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 21 एप्रिल : ‘2024 ला मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याची गरज काय, मी आताही दावा सांगू शकतो. 2024 ची कशाला वाट बघू, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाबद्दल मनातलं बोलून दाखवलं आहे. तसेच मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असंही अजित पवार म्हणाले होते. पुण्यात दैनिक सकाळ समुहाच्या वतीने अजित पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. या कार्यक्रमानंतर काही वेळातच कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत बॅनर लावले आहेत.
तुमच्या शहरातून (पुणे)
काय आहे बॅनरवर?
नुकतेच अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रकट मुलाखतीत बोलून दाखवली होती. त्यानंतर पुणे शहरात अजित पवार यांचे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून बॅवर लागले आहेत. “महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू! जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार! अशा आशयाचं अनेक बॅनर शहरात झळकत आहेत.
मुलाखतीत अजित पवार काय म्हणाले?
‘मी आता देखील मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. मी पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे ह्या दोन्ही माजी मुख्यमत्र्यांसोबत काम केलं. दोघांनाही आमदारकी पदाचा अजिबात अनुभव नव्हता. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आम्ही आनंदाने काम केलं. पृथ्वीराज चव्हाण सोबत आमच्या पक्षातील वरिष्ठांनी सागितलं म्हणून काम केलं, असंही पवार म्हणाले.
वाचा – …ते काम केलं असतं तर उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री असते, अजितदादा स्पष्टच बोलले
माझा आजचा कार्यक्रम पूर्वनियोजितच होता. शरद पवार सुद्धा तिथे आहे. पण हा कार्यक्रम अडीच महिन्यांपूर्वीच ठरला होता. त्यामुळे मी इथं आलोय. त्यामुळेच मी मुंबईच्या पक्षाच्या शिबिराला हजर राहू शकलो नाही. पण मीडियातून उगीच संभ्रम निर्माण केला जातो. मला या कार्यक्रमामुळे तिथे जाता आलं नाही, असा खुलासाही पवारांनी केला.
राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही पण प्रत्येक वेळी एकतर आमच्या जागा कमी आल्या पण एकदा मुख्यमंत्रिपदाची संधी असताना वरिष्ठ पातळीवर काही वेगळा निर्णय झाला आणि पक्षाने ती संधी गमावली, असंही पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.