चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 18 एप्रिल : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांनी पक्ष चिन्हाचा फोटो हटवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादीचा लोगो हटवल्याचं समोर आलं आहे. दरम्यान NCP चं नाव कायम ठेवलं आहे. या सर्व घडामोडींबाबत सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
तुमच्या शहरातून (पुणे)
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे –
गेल्या अनेक दिवसात वेताळ टेकडीबद्दल बातम्या येत आहेत. पुणेकर या ठिकाणी असलेल्या झाडांची कत्तल होणाऱ्या गोष्टीचा विरोध करत आहेत. स्थानिक विरोध जर असेल तर प्रशासनाने शांतपणे लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. कुठला ही प्रकल्प करताना विकास हवाच पण तिथल्या स्थानिकांशी बोलायला हवे, असे त्या म्हणाल्या. तर यावेळी अजित पवार यांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे भडकल्याचे दिसले.
मी अजित दादा यांचे ट्विटर पाहिलेले नाही. मी तपासून सांगते. 40 आमदार कशाबद्दल नाराज आहेत? अगदीच hypothetical आहे हे सगळं. मी, जयंतराव 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध असतो. त्यामुळे मला असं काहीही कळले नाही. तसेच 40 लोकं कोण नाराजी आहेत यांच्याशी मी बोलेल, असे म्हणत अजित दादा माध्यमांशी कधी बोलतात? पण ते कमी बोलत असतात. कुठल्याही चर्चेबद्दल मी सांगू शकत नाही. मी बारामतीत होते. शेतकरी यांचे प्रश्न असतील, ते पाहायला मी गेले होते. 15 मिनिटात मी अजित पवार यांचे ट्विटर आणि फेसबुक चेक करून सांगते, असेही त्या म्हणाल्या.
पवार साहेब नेहमी म्हणतात, कमी बोला त्यामुळे कमी बोलावं. तुमचा सेटअप मोठा असेल तर तो विधानभवनात लावा आणि बघा दादा काय करतात, असे म्हणत त्या पत्रकारावर भडकल्या. मी आता सांगितलं की दादा विधानभवनात आहेत. माझ्या बिचाऱ्या दादाचं असं झालंय की, काहीही झालं तरी खापर हे माझ्या दादावरच फोडतात, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी त्यांचे भाऊ आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची बाजू माध्यमांसमोर मांडली.
दरम्यान, उष्माघातामध्ये श्री सेवकांचा मृत्यूवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, हा अत्यंत हलगर्जीपणा आहे. 5 लाख दिले म्हणून तो कर्ता पुरुष किंवा स्त्री परत येणार नाही. धर्माधिकारी यांचे खूप अनुयायी आहेत, असे त्या म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.