पुणे, 13 एप्रिल : शरद पवार यांनी अदानी प्रकरणात जेपीसीवरून घेतलेल्या भूमिकेमुळं काँग्रेस अडचणीत सापडले होते. काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जेपीसीची मागणी करण्यात आली होती. मात्र शरद पवार यांनी जेपीसीची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं. यावरून चर्चेला उधाण आलं होतं, आणि त्यातच आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला देखील शरद पवार अनुपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. यावर आता शरद पवार यांनी स्वत: च स्पष्टीकरण दिलं आहे.
‘आम्ही सर्व एकत्र’
राज्यातलं सरकार अस्थिर आहे का? राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का असा प्रश्न विचारला असता, राहूल गांधींसोबत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला मला ही बोलवलं होत, पण मला इथे काही कामं होती. मी उद्या दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेणार आहे, आम्ही सगळे त्यांच्यासोबतच आहेत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे अजित पवार भाजपसोबत जाणार का या प्रश्नावर मात्र शरद पवार यांनी बोलंण टाळल्यानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
भाजपचा काँग्रेसला धक्का
दरम्यान दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गट आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आज वाशिममध्ये काँग्रेसचे 25 हजार कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात प्रत्येक बुथवर काँग्रेसच्या 25 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. राज्यभरात एक लाख बुथवर 25 लाख कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर सटाना विकास आघाडीचे दहा नगरसेवकही मंगळवारी भाजपात येणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.