पुणे, 8 एप्रिल : वीस हजार कोटींच्या आरोपांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठवलं आहे. या प्रकरणात संयुक्त संसदीय समितीची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. मात्र अशा समितीच्या नियुक्तीची आवश्यकता नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
जेपीसीत सत्ताधाऱ्यांचीच संख्या अधिक असेल त्यामुळे जेपीसी गठीत करून काहीच उपयोग नाही, 19 विरोधी पक्ष एकत्र आले तरी सर्वांना स्थान मिळणार नाही, त्यामुळे जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच अधिक योग्य राहिल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच अदानी यांना जाणून-बुजून टार्गेट करण्यात येत आहे असं आम्हाला वाटत असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
‘अदानींना मुद्दाम टार्गेट केलं जातय’
तुमच्या शहरातून (पुणे)
पुढे बोलताना ते म्हणाले की वीस हजार कोटींची आकडेवारी माझ्याकडे नाही. अदानींना जाणून-बूजन टार्गेट केलं आहे, असं वाटतं. जेपीसीत सत्ताधाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे जेपीसी गठीत करून काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच अधिक योग्य राहिलं. दरम्यान सध्या सावरकरांच्या मुद्यावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे ग्रुप सावरकरांच्या मुद्द्यावरून आमने-सामने आले आहेत. यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सावरकरांवर प्रतिक्रिया
सावरकरांच्या मुद्द्यावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वाटते का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, पक्षांची भूमिका सावरकरांबद्दल वेगवेगळी असू शकते. मात्र महाविकास आघाडीतल सर्व पक्ष एक आहेत. सध्या देशात महागाई, बेरोजगारी या सारखे मुद्दे महत्त्वाचे आहेत, त्यावर बोलण्याची अधिक गरज असल्याचंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.