बीड, 3 एप्रिल : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एमपीएसीचा पेपर अवघड गेल्यानं तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे. अक्षय आप्पासाहेब पवार वय 24, रा. राजेवाडी, ता. माजलगाव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनं जिल्हात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पेपर अवघड गेल्यानं आत्महत्या
तुमच्या शहरातून (बीड)
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एमपीएससीचा पेपर अवघड गेल्यानं अक्षय याने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आलीये. अक्षय आप्पासाहेब पवार वय 24, रा. राजेवाडी, ता. माजलगाव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत अक्षय हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यासाठी तो बीड शहरातील नगर रोडवरील गणेशनगर ‘भागात किरायाची खोली करून राहत होता.
अकस्मात मृत्यूची नोंद
रविवारी त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. परंतु अभ्यास करूनही पेपर अवघड गेल्याने तो चिंतेत होता. यातूनच त्याने हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान याप्रकरणी बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृतीची नोंद करण्यात आली आह. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.