रहमान, प्रतिनिधी
बस्ती, 18 एप्रिल : देशात अनैतिक संबंधातून पती किंवा पत्नीची हत्येच्या घटना समोर येत आहे. यातच आता आणखी एक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील मुंदरवा पोलिसांनी विवाहितेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीची हत्या केल्याचा आरोप महिलेवर आहे. 10 एप्रिल रोजी बस्तीच्या किथुरी रेल्वे क्रॉसिंगजवळ एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली होती, ज्याचा नंतर मृत्यू झाला होता. धर्मराज, असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
त्याचवेळी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता धक्कादायक बाबी समोर आल्या. मृताची पत्नी मीरा आणि तिचा प्रियकर गुड्डू यांच्यावर हत्येचा संशय होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीराचे एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिचा पती धर्मराज हा त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत होता. यादरम्यान, मीरा आणि तिच्या पतीमध्ये भांडण आणि वाद व्हायचे. यानंतर महिलेने हत्येचा कट रचला.
मृत धर्मराजच्या नातेवाईकांनी सांगितले की, 10 एप्रिल रोजी धर्मराज पत्नी मीरासोबत मुंडेरवा शहराशेजारी असलेल्या किठिऊरी गावात सायकलवरून गेला होता. पण कोणीही घरी परतले नाही. 11 एप्रिल रोजी धर्मराजचा साडू नरसिंगचा फोन आला की, धर्मराज मुंडेरवा पोलीस ठाण्यात आहेत.
कुटुंबीयांनी मुंडेरवा पोलीस ठाणे गाठले असता, स्थानक प्रमुख अरविंद कुमार शाही यांनी असा कोणताही प्रकार घडल्याचा इन्कार केला. जेव्हा कुटुंबीय बस्ती कोतवाली येथे पोहोचले तेव्हा त्यांना कळले की मुंडेरवा रेल्वे केबिन क्रमांक-188 जवळ रात्री एक व्यक्ती जखमी अवस्थेत आढळून आली. पण त्याचा मृत्यू झाला होता आणि त्याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. यावेळी हा मृतदेह धर्मराजचा असल्याची ओळख कुटुंबीयांनी पटवली. दुसरीकडे, या घटनेबाबत एसपी, अतिरिक्त एसपी आणि सीओ यांनी मुंडेरवा पोलीस स्टेशन गाठले आणि घटनेची बारकाईने चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असताना प्रभारी पोलीस निरीक्षक अरविंद कुमार शाही यांनी तिन्ही आरोपी प्रियकर गुड्डू, प्रेयसी मीरा आणि विद्यांचल यांना अटक केली आहे. विध्यांचल हा मीरा आणि गुड्डू यांचा मित्र आहे. यासोबतच पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून दगडाचा तुकडा (रक्ताने माखलेला), मृताचा मोबाईल आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिसांनी मुंडेरवा पोलिस ठाण्यात कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.