सूरत 14 मे : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. मात्र, काहीवेळा यादिवशीच असं काही घडतं, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. एक नवरदेवासोबतही असंही काहीसं घडलं. गुजरातमधील सूरत शहरात लग्नाआधीच नवरदेवासोबत एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेत नवरदेवाला कुत्र्याने चावा घेतला. यानंतर त्याने लग्नाआधी अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी हॉस्पिटल गाठलं.
सुरतमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भटके कुत्रे लोकांवर हल्ला करत आहेत. सुरत शहरातील नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज कुत्रा चावल्याच्या 30 ते 40 केसेस येत आहेत. त्यानुसार दर महिन्याला सुमारे एक हजार लोकांना भटके कुत्रे चावा घेत आहेत.. मिळालेल्या माहितीनुसार, सुरत शहरातील अमरोली कोसाड भागात राहणाऱ्या एका वराला कुत्र्याने चावा घेतला.
प्रेमाचा भयानक शेवट! आधी गर्लफ्रेंडची हत्या, मग फेसबुकवर लाईव्ह येत तरुणाचं धक्कादायक कृत्य
यानंतर वराला इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात जावं लागलं. यावेळी कुत्र्याने चावा घेतलेले लोक रूग्णालयात रांगेत उभे होते. लोक रूग्णालयात आपली पाळी येण्याची वाट पाहत होते. या लोकांमध्ये हळद लावलेला एक नवरदेवही इंजेक्शन घेण्यासाठी पोहोचला होता.
कुत्रा चावलेल्या सुफियान पटेल याने सांगितलं की, 6 दिवसांपूर्वी तो घराबाहेर उभा होता, तेव्हाच दोन भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. ज्यामध्ये तो कुत्र्याच्या चाव्याचा बळी ठरला. आज लग्न आहे, पण त्याआधी हळद लावून अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी इथपर्यंत पोहोचलो आहे. सुरत न्यू सिव्हिल हॉस्पिटलचे आरएमओ केतन नायक यांनी सांगितलं की, एकट्या सुरत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज सुमारे 29 ते 40 कुत्रे चावण्याच्या घटना येतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.