प्रियांका माळी, प्रतिनिधी
पुणे, 14 मे : पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हंटले जाते तसेच कलेच्या बाबतीतही ते तितकेच खरे आहे. पण याच पुण्यात कुटुंब आणि घर नसलेला एक कलाकार आहे. कलेच्या जोरावर हा कलाकार आपला उदरनिर्वाह करत आहे. गेली दीड वर्षे लक्ष्मी रोडच्या फूटपाथवर बसून तो चित्र रेखाटत आहे. त्याने काढलेले चित्र लोकांच्या मनात घर करून जातात.
कोण आहे कलाकार?
तुमच्या शहरातून (पुणे)
राजेंद्र खळे हे 65 वर्षीय चित्रकाराचे नाव आहे. राजेंद्र यांचे शिक्षण सातवी झालेले आहे. राजेंद्र यांना लहानपणापासूनच चित्रकेलची आवड होती. पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना चित्रकला बाजूला ठेवून नाइलाजास्तव वेटर, सफाई कर्मचारी, मजुरी यांसारखी कामे करावी लागली. एक वाईट गोष्ट आपले सर्व आयुष्य बदलवू शकते, असे आपण म्हणतो; पण असे काहीसे प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्यात घडले.
काळाने घात केला आणि अपघात झाला
कुटुंबामध्ये सर्व काही सुरळीत चालू असताना त्यांचे वडील वारले त्या धक्क्याने आई मानसिकदृष्ट्या कमकुवत झाली. त्यामुळे त्यांना अठराव्या वर्षीच पैसे कमवण्यासाठी त्यांना बाहेर पडावे लागले. संपूर्ण 5 वर्षे मिळेल ते काम करत आईचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह ते करू लागले. परंतु काळाने घात केला आणि अपघात झाला.
चित्रकला बनली उदरनिर्वाहाचे साधन
अचानक झालेल्या अपघातामध्ये त्यांना एक पाय गमवावा लागला. काहीच करता येईना एकाच जागी बसून असल्याने उदरनिर्वाहाचे साधन बंद पडले. एके दिवशी कोरा कागद आणि पेन हातात घेतला आणि समोर पेपरात आलेले चित्र त्यांनी रेखाटले. काही सराव नसताना चित्र उत्तम रेखाटले गेले. त्यावेळी त्यांनी ठरवले आता हेच आपले उदरनिर्वाहाचे साधन. त्यावेळेपासून रस्त्यावर बसून राजेंद्र खळे चित्र रेखाटू लागले.
Inspiring Story: बैलगाडी उलटली, दोन्ही पाय गेले, पण सचिन थांबला नाही, जिद्दीची अनोखी कहाणी, Video
4 हजार चित्रे काढली
येणारी जाणारी लोक चित्र पाहत थांबू लागली. मदत म्हणून त्यांच्यातील काही ते विकतही घेऊ लागली. काही मुलांनी मिळून राहण्याची सोय करुन दिली. त्यातून दोन वेळचे खाणे भागू लागले. कला ही कधी वाया जात नाही. हातात काही नसेल तरी कला तुमचे पोट भागवू शकते, मी आतापर्यंत 4 हजार चित्रे काढली आहेत, असं राजेंद्र खळे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.