कोलकाता, 16 मे : आयपीएल प्लेऑफमध्ये खेळण्याची कोलकाता नाइट रायडर्स टीमची आशा अद्याप थोडी कायम आहे. अर्थात, लखनौ सुपर जायंट्स टीमविरुद्धची शेवटची होम ग्राउंडवरची मॅच ते जिंकले तरच… तोपर्यंत बाकीच्या टीम्सच्या अन्य मॅचेस ते पाहत आहेत. तसं असलं, तरी चेन्नई सुपर किंग्ज टीमला हरवल्यानंतर संपूर्ण KKR टीम उत्साहात आहे. KKR टीमसाठी पहिल्यांदाच खेळल्यानंतर अफगाणिस्तानचा खेळाडू रहमानुल्ला गुरबाझ कोलकात्याच्या प्रेमात पडला आहे. अधिक नेमकेपणाने सांगायचं, तर त्याला कोलकात्याचे रसगुल्ले खूपच आवडू लागले आहेत. KKR टीमचा विकेटकीपर बॅट्समन असलेला गुरबाझ आयपीएलच्या प्रत्येक मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.
तो अफगाणिस्तानातला क्रिकेटर असला, तरी भारतीय सिनेमे, क्रिकेट आणि भारतीय खाद्यपदार्थ यांबद्दल तो पॅशनेट आहे. KKR टीम जिथे जिथे खेळायला गेली, तिथे तिथे त्याने स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. सनरायझर्स हैदराबाद टीमविरुद्ध खेळायला गेलेला असताना बिर्याणीबद्दलची त्याची उत्सुकता चाळवली गेली. कोलकाता ही टीमची होम सिटी आहे. त्यामुळे कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीची ओळख गुरबाझला झाली. त्यातूनच तो कोलकात्यातल्या रसगुल्ल्यांच्या प्रेमात पडला.
गुरबाझला भारतीय सिनेमांबद्दलचीही जाण आहे. नवा प्रत्येक भारतीय सिनेमा तो पाहतो. त्यामुळे भारतीय अभिनेते-अभिनेत्रींच्या अभिनयशैलीबद्दलही त्याला माहिती आहे. तिथूनच त्याला शाहरुख खानबद्दल आकर्षण निर्माण झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.