मुंबई : भारताच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे. नीरज चोप्राने कमालीची कामगिरी केली आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने पूर्ण फिट झाल्यानंतर पुन्हा मैदानात उतरला. त्याने आपल्या नवीन इनिंगची सुरुवात दमदार केली आहे. दोहा डायमंड लीगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन्सना पराभूत करून त्याने विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
दोहा, कतार इथे झालेल्या या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ मीटर भालाफेक केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या जेकोब वडलेचने दोहा डायमंड लीगमध्ये नीरजनंतर दुसरे स्थान पटकावले. या विजयासह नीरजने अँडरसन पीटर्सकडूनही मागील पराभवाचा बदला घेतला. अँडरसनने गेल्या वेळी दोहा डायमंड लीगमध्ये नीरजला हरवून विजेतेपद पटकावलं होतं. अँडरसनने या स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं.
Huge start for #NeerajChopra, who hits 88.67m with his first throw at the #DohaDL. It’s a WORLD LEAD! ⚡ #DiamondLeague #CraftingVictories 🇮🇳 pic.twitter.com/dwIgXbuDQk
— Inspire Institute of Sport (@IIS_Vijayanagar) May 5, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.