मुंबई, 21 मे : ‘तुमको पुलिस ने चारों तरफ से घेर लिया है, अब तुम्हारे पास बचने का कोई चारा नहीं है. अपने आप को पुलिस के हवाले कर दो.’ बॉलिवूड सिनेमातील ही ठरलेली वाक्य प्रेक्षकांच्या देखील तोंडपाठ असतील. 70च्या दशकात 2-3 सिनेमांनंतर जवळपास सगळ्यात सिनेमात हा डायलॉग ठरलेला असायचा. त्या काळात क्राइम बेस असलेल्या सिनेमाचा बोलबाला होता आणि या सिनेमांसाठी एक पोलिसाची गरज होती. याच वेळी समोर आले अभिनेता जगदीश राज. त्यानी अनेक सिनेमांमध्ये पोलिसांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या आयुष्यात पोलिसांची भूमिका इतकी सहज झाली की त्यांनी पोलीस सोडून कधीच कोणतीच भूमिका हाती घेतली नाही. त्याच जगदीश राज यांच्याबद्दल जाणून घेऊया.
आपल्या देशात VVIP माणसांना म्हणजेच पंतप्रधान, राष्ट्रपती, जज, मुख्यमंत्री, दलाई लामा सारख्या मोठ्या व्यक्तींना एअरपोर्ट सारख्या ठिकाणी सिक्युरिटी चेकींगची गरज नसते. याच VVIP लिस्टमध्ये एक नाव होतं ते म्हणजे पोलिसांची भूमिका साकारणारे अभिनेते जगदीश राज यांचं. गंमत म्हणजे स्वत: पोलीस जगदीश राज यांना एअरपोर्टवर सोडायला जायचे. याचं कारण देखील फार खास होतं.
हेही वाचा – भारतातील पहिली TV स्टार; आधी कॅन्सरशी झुंज नंतर हार्ट अटॅक, माजी पंतप्रधानांनी वाहिली होती श्रद्धांजली
अभिनेते जगदीश यांना त्याकाळी खूप प्रसिद्धी मिळाली होती. पोलीस तर त्यांना त्यांचे हिरो मानायचे. जगदीश यांच्याबरोबर त्यांचा इतका कनेक्ट होता की, जगदीश कधी सिग्नलला उभे असले तरी पोलीस त्यांना सॅल्युट करायचे. इतकंच काय तर जगदीश यांनी कधी चुकून सिग्नल मोडला तर त्यांच्याकडून दंड देखील आकारत नसत.
जगदीश राज यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत 250 सिनेमात काम केलं. यातील जवळपास 144 सिनेमात त्यांनी केवळ पोलिसांची भूमिका साकारली. 1975मध्ये आलेल्या ‘एक महल हो सपनो’ का सिनेमात त्यांनी विलन साकारला होता. तर 1961मध्ये आलेल्या ‘प्यार का सागर’ आणि ‘दो अंजाने’ सिनेमात त्यांनी डॉक्टरची भूमिका साकारली होती. तसंच इतर दोन सिनेमात त्यांनी जज देखील साकारले होते. पण खरी ओळख त्यांना पोलिसांच्याच भूमिकेनं दिली.
‘सीआईडी’,’जॉनी मेरा नाम’, ‘डॉन’, ‘दीवार’ सारख्या अनेक मोठ्या सिनेमात जगदीश राज पोलिसांच्या भूमिकेत आहेत. त्यांचं नाव गिनीज बुक देखील नोंदवण्यात आलं आहे. जेव्हा त्यांचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आलं तेव्हा त्यांचं सिनेमात प्रमोशन झालं होतं. तेव्हा ते पोलीस कमिशनरची भूमिका साकारत होते. 2004मध्ये आलेल्या ‘मेरी बीबी का जबाव नही’ सिनेमात तर ते DIG होते. हा त्यांच्या शेवटचा सिनेमा ठरला. या सगळ्या प्रवासात जगदीश राज यांनी स्वत:साठी स्वत:ची पोलिसांची वर्दी देखील शिवली होती. म्हणजे डायरेक्टरचा फोन आला की दुसऱ्या दिवशी ते थेट वर्दीच शुटींगसाठी सेटवर पोहोचायचे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.