संजय शेंडे, प्रतिनिधी
अमरावती, 17 मे : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून आत्महत्या, खून, आत्महत्या तसेच आर्थिक फसवणुकीच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण म्हणजेच बीएचएमएसचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
अमरावती शहरातील राजापेठ येथील होमिओपॅथी महाविद्यालयातील विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. ऋतुजा ढेंगरे असे 23 वर्षांच्या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ऋतुजा ही परभणी जिल्ह्यातील होती. पण ती सध्या अमरावती येथे बीएचएमएसचे शिक्षण घेत होती.
ऋतुजा ही द्वितीय वर्षाला शिकत होती. महाविद्यालयामागे असलेल्या एका खासगी हॉस्टेलमध्ये ती तिसऱ्या माळ्यावरील एका रुममध्ये राहत होती. सकाळी ती खाली न आल्याने केअरटेकरने तिच्या खोलीत पाहले असता तिने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
हेही वाचा – मध्यरात्री अल्पवयीन मुलीसोबत रस्त्यावर धक्कादायक घटना, अमरावतीत खळबळ
दरम्यान, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 23 वर्षांच्या ऋतुजा ढेंगरे या विद्यार्थिनीने आत्महत्या का केली, याबाबतचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण या घटनेने खळबळ उडाली असून, पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.