लखनौ, 2 मे : अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राच्या फिरकीची जादू आयपीएलमध्ये धमाल करत आहे. लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या अमित मिश्राने आरसीबीविरुद्ध मोठी कामगिरी केली. त्याने आरसीबीच्या सुयश प्रभुदेसाईला बाद करत मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा विश्वविक्रम मोडला. आता मिश्राच्या निशाण्यावर युजवेंद्र चहलचा विक्रम आहे.
आरसीबीच्या डावातील 15 व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर अमित मिश्राने सुयश प्रभुदेसाईला बाद केलं. 40 वर्षांच्या अमित मिश्राची आयपीएलमधील ही 171वी विकेट आहे. यासोबत अमित मिश्राने लसिथ मलिंगा, पियूष चावला आणि आर अश्विनचा विक्रम मोडला. या तिघांच्या नावावर प्रत्येकी 170 विकेट आहेत. आय़पीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अमित मिश्रा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत ड्वेन ब्राव्हो पहिल्या तर युजवेंद्र चहल दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्रावोने 183 तर चहलने 178 विकेट घेतल्या आहेत.
कोहली आणि गंभीर राडा! IPL मॅचनंतर मोठी कारवाई, टीम आणि चाहत्यांना धक्का
आय़पीएलमध्ये फिरकीपटू म्हणून सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये अमित मिश्रा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे आता फक्त युजवेंद्र चहल आहे. अमित मिश्रा दोन वर्षांनंतर आयपीएल खेळत आहे. याआधी तो 2021 मध्ये आय़पीएल खेळला होता. अमित मिश्राने आरसीबीविरुद्ध 2 गडी बाद केले. त्याने आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसीला तंबूत धाडलं. डुप्लेसि 44 धावांवर खेळत असताना कृणाल पांड्याच्या हाती झेल देऊन बाद झाला.
सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामन्यात लखनऊला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. कर्णधार केएल राहुलला दुखापत झाल्याने मैदान सोडावं लागलं. फिल्डिंग करताना त्याला दुखापत झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.