मुंबई, 30 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या रेडिओवरील कार्यक्रमाचा आज ऐतिहासिक असा १००वा एपिसोड झाला. या निमित्ताने केंद्रीय मंत्र्यांसह सर्व राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष, नेते, पदाधिकारी यांनी मन की बातचा एपिसोड ऐकला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी मुंबईत उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम फक्त एक रेडिओ कार्यक्रम नाही. तर चांगल्यासाठी सामाजिक बदलाचं आंदोलन आहे. लोकशाही अभिव्यक्तीचं व्यासपीठ आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या १०० व्या मन की बातमध्ये सांगितलं की, माझ्या प्रिय देशवासियांनो. नमस्कार. आज मन की बातचा १०० वा एपिसोड आहे. तुमच्या सर्वांची पत्रे, संदेश मिळाले आणि मी जास्ती जास्त पत्रे वाचायचा प्रयत्न केला. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी विजयादशमीच्या दिवशी मन की बात सुरू केली होती. मन की बातला इतके महिने आणि इतकी वर्षे झाली यावर विश्वास बसत नाही.
Mann Ki Baat देशाचा आवाज बनलीय, PM मोदींनी साधला संवाद
तुमच्या शहरातून (मुंबई)
मला या कार्यक्रमाने तुमच्यापासून दूर होऊ दिलं नाही. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांशी बोलणं, भेटणं व्हायचं. पण पंतप्रधान झाल्यानंतर इथलं आयुष्य वेगळं आणि काम वेगळं, जबाबदारी, अनेक प्रोटोकॉल, वेळेची मर्यादा आहेत. सुरुवातीला रिकामं वाटायचं. ५० वर्षांपूर्वी घर यासाठी नव्हतं सोडलं की आपल्याच लोकांशी संपर्क कमी होईल. मन की बातने मला सामान्य माणसाशी जोडण्याचा मार्ग दिला. पदभार, प्रोटोकॉल व्यवस्थेपर्यंतच मर्यादित राहिला असं मोदींनी म्हटलं.
मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार पराग अळवणी आणि खासदार पूनम महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.