अमृतसर, 11 मे : पंजाबच्या अमृतसरमध्ये मध्यरात्री सुवर्णमंदिराजवळ पुन्हा एकदा स्फोट झाला. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. याआधी झालेल्या दोन स्फोटांपेक्षा वेगळ्या ठिकाणी हा स्फोट झाला. आधीच्या स्फोटापासून दोन किमी दूर अंतरावर तिसरा स्फोट झाला. सुवर्णमंदिराजवळ झालेला ताजा स्फोट श्री गुरु रामदास सराय जवळ रात्री एक वाजता झाला. पोलिसांनी या प्रकरणी तरुण आणि तरुणीला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या मुलाच्या बॅगेतून काही इंजेक्शन जप्त करण्यात आल्याचंही सांगण्यात येतंय.
स्फोटाचा आवाज आल्यानंतर श्री गुरु रामदास सराय रिकामे करण्यात आले. स्फोट झालेला परिसर पोलिसांनी सील केला आहे. सुदैवाने जिथे स्फोट झाला तिथे लोकांची वर्दळ कमी होती. एसजीपीसी अध्यक्ष हरजिंदर सिंह धामी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी ज्याला ताब्यात घेतलं त्याचं नाव यादवीर सिंह असून तो गुरदासपूरमध्ये राहत असल्याची माहिती समोर आलीय. त्याच्या बॅगमध्ये काही स्फोटक साहित्य आढळून आलं आहे.
#WATCH | Amritsar: Visuals from outside the building of Shri Guru Ramdas Ji Niwas from where suspects were rounded up in the aftermath of a loud sound, that was heard near the Golden Temple, which, as per the police, could be another explosion.#Punjab pic.twitter.com/CXzms3FdYw
— ANI (@ANI) May 10, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.