मुंबई, 26 एप्रिल : शिवसेनेची धुरा आज जर तुमच्या हाती असती तर अशी परिस्थिती आली नसती. ऐन राज्य हातात असताना एवढे शिवसैनिक पळून जाणं, एवढे नेते दूर होणे हे कधीच झालं नसतं, तुम्ही नसता तर आज हे चित्र नसतं, तुम्ही सहमत आहात का? असा थेट प्रश्न अमृता फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला. यावर राज ठाकरे यांनी हेलिकॉप्टर, विमान आणि रॉकेटचा विनोद सांगून खुमसदार उत्तर दिलं.
दैनिक लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023 या कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी घेतली. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या शैलीत उत्तरं दिली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
अमृता फडणवीस – तुम्हाला बघितलं की हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत समोर येतं. तशीच बोलण्याची पद्धत, तोच करिष्मा तोच दबदबा…मला वाटतं लहानपणापासून तुम्ही राज ठाकरे यांचे फेव्हरट होता, लाडाने तुम्हाला टिनू म्हणायचे…शिवसेनेची धुरा आज जर तुमच्या हाती असती तर अशी परिस्थिती आली नसती. ऐन राज्य हातात असताना एवढे शिवसैनिक पळून जाणं, एवढे नेते दूर होणे हे कधीच झालं नसतं, तुम्ही नसता तर आज हे चित्र नसतं, तुम्ही सहमत आहात का?
राज ठाकरे – मला असं वाटतं, पोलीस व्हॅनमधून घेऊन जातात आणि तुम्ही मध्ये बसलेले असतात असं मला वाटत आहे. मला दिवार चित्रपटातील डॉयलॉग आठवला आहे, ‘मेरे साथ भाई बोल रहा है, की पोलिसांच्या वेशात भाऊ बोलत आहे’ मला असं वाटतंय मी तो विषय बंद केला आहे. त्याच गोष्टींना आता काही अर्थ नाही. झालं ते लोकांच्या समोर आहे. जे सांभाळतील ते सांभाळतील, मी वेगळा पक्ष काढला आहे. एक विनोद आहे, एकदा हेलिकॉप्टर, विमान आणि रॉकेट बसलेले असतात. हेलिकॉप्टर म्हणतं की, पंखे फिरून माझं डोकं दुखायला लागलं आहे, सायन्सचा त्रास होत आहे. विमान पण म्हणतं की, मी इतक्या उंचावर उडतो ना वारं आल्यामुळे माझं नाक दुखायला लागतं. बाजूला रॉकेटला विचारलं तो म्हणाला, काय तुला सांगणार ज्याची जळते त्याला कळते. त्याच्यामुळे मी पक्ष स्थापन केला माझं काय चाललंय हे मला माहिती आहे. मी आता दुसऱ्याच्या धुरा वाहणार नाही.
अमोल कोल्हे – महाराष्ट्रातील दोन लोक आहे, जे बोलले नाही तर बातमी होते आणि बोलले तर ब्रेकिंग होते असे शरद पवार आणि दुसरे राज ठाकरे आहे. मीडिया हँडल करण्याचं स्किल कसं आलं?
राज ठाकरे – असं कोणतंही स्किल नाही, मला जे आठवतं ते मी बोलत असतो. अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सुद्धा असंच बोललो होतो. पण त्यावरून वाद झाला. अमिताभ बच्चन यांना जर उत्तर प्रदेशमध्ये शाळा काढल्या, संस्थांना मदत केली. मग अमिताभ बच्चन यांना त्यांना अभिमान असेल तर मग राज ठाकरे यांना आपल्या राज्याबद्दल अभिमान का असू नये. एवढचं मी बोललो होतो.
अमृता फडणवीस – राजकारणी मंडळी खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहे. तुम्हाला असं वाटतं का मीडिया यात पुढाकार घेऊन हे थांबवू शकते. नॉटी लोकांच्या घरी जाऊन मुलाखती घेतात, हे बंद केला तर फरक पडेल
राज ठाकरे – या गोष्टी बंद केल्यातर हे बोलणं बंद करतील. मीडियांनी दाखवलं नाहीतर ते बोलणं सुद्धा थांबवतील. पण ते टीआरपीचं काही करू शकत नाही.
अमृता फडणवीस – राजकारणात डोळे मारणं आणि टाळी मारणं सुरू आहे. राहुल गांधींनी मोदींजींना मिठ्ठी मारली, अजित पवारांनी उद्धव ठाकरेंकडे माईक दिला आणि डोळा मारला. तुमचा काय प्लॅन आहे, टाळी द्यायचा ?
राज ठाकरे – डोळे मारायचा, ज्या वयात या गोष्टी करायच्या असतील त्या करायच्या असतात. त्यांच्या या गोष्टी वयात राहून गेल्या असतील म्हणून ते असं करत असतील.
अमृता फडणवीस – तुम्ही कोणाला साथ देणार?
राज ठाकरे – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे कोणासोबत आहे, ते कळत नाही. ते पहाटे गाडी घेऊन जातात. कित्येक वेळा तुम्हाला माहिती नसतं. मग कधी ते शिंदेंसोबत असतात. मग अजितदादांचा चेहरा उतरलेला असतो. कुणाला भेटणं आणि बोलणं ही बातमी झाली आहे. एक राजकारणातला मोकळेपणा होता, तो मीडियाने घालावला आहे. त्यामुळे त्याला आता अर्थ उरला नाही. कुणी कुणाला भेटलं आणि बोललं तर युत्या आणि आघाड्या होत नाही. जोपर्यंत स्वरूप येत नाही, त्यामुळे पुढे काही होत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.