मुंबई, 22 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 31 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळावला जात आहे. मुंबईच्या होम ग्राउंडवर पारपडत असलेल्या या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने त्याची पहिली विकेट घेतली आहे. अर्जुनने भेदक यॉर्कर टाकत पंजाब किंग्सच्या संघाला मोठा धक्का दिला.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवला जात असून या सामन्यात सुरुवातीला कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पंजाब किंग्सकडून मॅथ्यू शॉर्ट आणि प्रभसिमरन सिंह हे दोघे फलंदाजीसाठी मैदानात आले. कॅमेरून ग्रीनने तिसऱ्या ओव्हरमध्ये मॅथ्यू शॉर्टची विकेट घेतल्यावर मैदानात उपस्थित असलेला प्रभसिमरन सिंह हा खेळाडू मैदानावर चौफेर फटकेबाजी करत होता. परंतु प्रभसिमरन सिंहला बाद करण्यात अर्जुन तेंडुलकर ला यश आले.
YORKED!
Arjun Tendulkar gets Prabhsimran Singh out with a ripper 🔥🔥
Follow the match ▶️ https://t.co/FfkwVPpj3s #TATAIPL | #MIvPBKS pic.twitter.com/W3kIQZ7Xyq
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.