मुंबई, 22 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये 31 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवला गेला. यात प्रथम फलंदाजी करून पंजाबने मुंबई समोर विजयासाठी 215 धावांचे आव्हान ठेवले. या दरम्यान मुंबईचा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने टाकलेल्या एका ओव्हरमध्ये पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी तब्बल 31 धावा ठोकल्या.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात टॉस जिंकत कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना पंजाबच्या 8 विकेट्स घेण्यात यश आले परंतु शेवटच्या काही ओव्हर्समध्ये पंजाबच्या सॅम करन,जितेश शर्मा आणि हरप्रीत सिंह यांनी मुंबईच्या गोलंदाजांना अक्षरश धुतले.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांपैकी अर्जुन तेंडुलकरने टाकलेल्या 3 ओव्हरमध्ये पंजाब किंग्सने सर्वाधिक 48 धावा केल्या. अर्जुन तेंडुलकरला सातव्या ओव्हरमध्ये प्रभसिमरनची एक विकेट घेण्यात यश आले. परंतु त्यानंतर अर्जुनने 16 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना पंजाब किंग्सला तब्बल 31 धावा दिल्या. या ओव्हरमध्ये अर्जुनने टाकलेल्या जवळपास प्रत्येक बॉलवर पंजाबच्या फलंदाजांनी चौकार षटकारांची आतिषबाजी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.