मृत्युंजय कुमार, प्रतिनिधी
बोकारो, 13 मे : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बलात्कार, आत्महत्या, खून यांसारख्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
बोकारो जिल्ह्यातील बीएस शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर 2 मध्ये असलेल्या शाळेच्या आवारात 24 वर्षीय ऑटोचालकाचा खून करून मृतदेह झाडाला लटकवल्याची घटना समोर आली आहे. सकाळी शुभमचा मृतदेह झाडाला लटकलेला पाहून लोकांनी त्याच्या वडिलांना याची माहिती दिली. काल रात्री नऊच्या सुमारास शुभव ऑटोने निघाला होता. पुन्हा घरी परतलाच नाहीत. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
शुभम घरी न परतल्याने त्याचे वडील अनिल कुमार यांनी पहाटे दीडच्या सुमारास त्याच्या नंबरवर फोन केला. अर्ध्या तासात घरी परतत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सकाळपर्यंत तो घरी आला नाही. त्यानंतर मोबाईलही बंद येऊ लागला. त्याचा खून झाल्याची शक्यता मृताच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, शुभमची हत्या केल्यानंतर ही आत्महत्या आहे असे दाखवण्यासाठी मृतदेह झाडाला लटकवला. शुभमचे कोणाशीही वैर नसल्याचे त्यांनी सांगितले. पण कधी कधी तो दारूच्या नशेत असायचा. संध्याकाळी तो मित्रासोबत दिसला होता.
स्टेशन प्रभारी महेश प्रसाद सिंह यांनी सांगितले की, 24 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मृतदेह झाडाला दोरीच्या साहाय्याने लटकलेला असल्याचे दिसून आले. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. जरी शरीरावर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.