मुंबई, 28 एप्रिल : जगप्रसिद्ध क्रिकेट लीग असलेली इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेचा 16 वा सीजन आता रंगात येऊ लागला आहे. प्रेक्षकांना दररोज रोमांचक सामने पाह्यलं मिळत असून यात देशविदेशातील स्टार खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धा असली तरी अनेकदा विरुद्ध संघांचे खेळाडू मैदानावर एकमेकांसोबत मजा मस्ती करताना दिसतात. तेव्हा पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्सच्या खेळाडूंमधील असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
आयपीएल 2023 मध्ये 38 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात होणार आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून या सामन्याच्या सरावासाठी पंजाब आणि लखनऊची टीम एकत्र आली होती. या दरम्यान लखनऊ सुपर जाएंट्सचा धाकडं फलंदाज निकोलस पूरन आणि अर्शदीप सिंह या दोघांमध्ये मॅचनंतर पार्टी करण्यासंदर्भात चर्चा झाली. या चर्चेत निकोलस याने पार्टीत दाल मखनी, बटर चिकन, दाल बाटी चुरमा हे पदार्थ खाण्याची मागणी केली. यावर निकोलसच्या हिंदी उच्चरांवरून सर्वजण त्याची मजा घेताना दिसले.
Mohali checklist for @nicholas_47: Sixes & dal makhani 😂 pic.twitter.com/xLs10Bl0ox
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 27, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.