प्रशांत कुमार (बरेली), 17 मे : उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका अल्पवयीन मुलाने प्रेयसीसाठी धारदार शस्त्राने आपल्या मित्राचा गळा चिरून खून केला. युपीच्या दिगोही गावातील ही घटना आहे. मृत सोनूची आरोपीच्या मैत्रिणीशी प्रेम असल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. याबाबत आरोपीला समजताच तो संतापला अन् मित्राला धडा शिकवण्यासाठी त्याने त्याच्या हत्येचा कट रचला.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सोनूला त्याच्या दोन मित्रांनी घरातून बोलावत जंगलात नेऊन धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. याबाबत खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी पाळत आणि श्वान पथकाच्या मदतीने आरोपीला अटक केली.
चौकशीत आरोपी प्रियकराने गुन्ह्याची कबुली दिली असून आम्ही दोघे एकत्र असल्याचेही सांगितलं. पण सोनूने माझ्या मैत्रिणीसोबत प्रेम करून तिच्याशी संपर्क वाढवला. याचाच मला राग आला होता.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक याच मुलीचा माजी प्रियकर असून तो या दिवसांत सोनूच्या संपर्कात होता. मुलीच्या पहिल्या प्रियकर आणि सध्याच्या प्रियकराने सांगितले की आम्हाला सोडून ती दुसऱ्यासोबत जास्त राहत होती. याबाबत मी त्यांना सावध केले होते. पण ते सुधारले नाहीत. त्यानंतर माझ्या दुसऱ्या मित्राच्या मदतीने मी सोनूला बोलवून कुऱ्हाडीने गळा चिरून त्याचा खून केला.
लग्नात सप्तपदी घेण्याआधी असं काही घडलं अन् वधू-वराने केलं विष प्राशन
बरेलीचे एसपी आरएस राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, सोनूची हत्या त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांनी केली. प्रेमप्रकरणातून हत्येची बाब मान्य केली आहे. दोघांकडून कडक चौकशी करण्यात येत आहे. चौकशीअंती दोघांची वैद्यकीय चाचणी करून तुरुंगात पाठवण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.