अभिषेक उपाध्याय (आझमगड), 27 एप्रिल : उत्तर प्रदेशमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रकरणात मोठी वाढ होताना दिसत आहे. मागच्या काही महिन्यांपासून गोळीबार, खून या प्रकरणांमुळे युपीत कायदा व सुव्यवस्था बिघडत जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे युपी पोलिसांच्या कारवाईवर सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान पुन्हा एक नवीन प्रकरणसमोर आलं आहे. एका तरूणीवर काही पुरूषांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सुमारे पाच लाख रुपये उकळणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींची थेट कारागृहात रवानगी करत. दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मुंबईत दहशत निर्माण करण्याचा कट! महाराष्ट्र दिनी दहशतवादी हल्ल्याची भीती, कलम 144 लागू
मेहनगर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात मेहनगर शहरातील अतिक उर्फ छोटक याच्यावर ब्लॅकमेल केल्याचा आरोप करत लेखी तक्रार दिली आहे. सुमारे एक वर्षापूर्वी त्याने अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवला होता.
हा व्हिडिओ दाखवून आरोपींनी पीडितेकडून 10 हजार, 15 हजार असे करत 5 लाखांहून अधिक रुपये घेतले. या संपूर्ण प्रकरणामध्ये ओसामा, सरजील आणि सलमान या तीघांनी मदत केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी पिडीता शाळेत जात असताना तिला धमकी दिली. आम्हाला पैसे नाही दिल्यास अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे पिडीतेच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इस्रायलस्थित्य ओसामा याचा देखील समावेश आहे. तर दुसऱ्या आरोपीचे नाव सलमान असे आहे.
भारत पुन्हा घरात घुसून मारणार? पुंछमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राइकची भीती
या दोघांना मेहनगरच्या अक्षरबेर पुलिया येथून अटक करून कारागृहात पाठवण्यात आले. याप्रकरणी नगरचे पोलीस अधीक्षक शैलेंद्र लाल यांनी सांगितले की, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी पथके कार्यरत आहेत. लवकरच त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.