नवी दिल्ली, 21 एप्रिल : उत्तर प्रदेश मधील प्रयागराजमध्ये गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर या प्रकरणात आता दहशतवादी संघटना अल-कायदा उडी घेतली आहे. 7 पानी मासिक जारी करत त्यांनी बदला घेण्याची धमकी दिली आहे. या मासिकाबाबत तपास यंत्रणा सतर्क झाली असतानाच पोलीसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांची प्रयागराजमध्ये 15 एप्रिल रोजी अरुण मौर्य, सनी आणि लवलेश तिवारी या 3 तरुणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तिघांनाही जागीच अटक करण्यात आली. या हत्या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
भारतीय उपमहाद्वीपातील अल कायदा (AQIS) च्या धमकीनंतर, पोलिसांनी उत्तर प्रदेशातील संवेदनशील भागांसह प्रयागराजमध्ये सुरक्षा अधिक मजबूत केली आहे. वृत्तानुसार, अल कायदाने ईदच्या संदेशात ही धमकी दिली आहे. त्यांनी अतिक अहमद आणि अशरफ यांना शहीद घोषित केले आहे. या मासिकात मुस्लिमांना मुक्त करा असे म्हटले आहे.
आरोपींना मिळाली होती सुपारी
लवलेश तिवारी (बांदा), मोहित उर्फ सनी (हमीरपूर) आणि अरुण मौर्य (कासगंज) यांच्यावर अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या तिघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (खून) आणि 307 (हत्येचा प्रयत्न) तसेच शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्रीच तिन्ही आरोपींना पकडले असून घटनेत वापरलेली हत्यारे जप्त केली होती.
वाचा – गर्लफ्रेंडच्या हट्टापायी लाखोंची नोकरी सोडली, आयआयटीयन बनला चोर, पण शेवटी..
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही हल्लेखोर एकमेकांना आधीच ओळखत होते. सनी आणि लवलेशची बांदा जेलमध्ये भेट झाली, नंतर त्यांची मैत्री झाली, तर सनी आणि अरुण आधीच मित्र होते आणि सनीनेच लवलेशची अरुणशी ओळख करून दिली. अतिक (60) आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी रात्री प्रयागराज मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.