मुंबई, 25 एप्रिल: वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण परीक्षेत पात्र होण्यासाठी जीवाचं रान करतात. रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेत जॉब मिळवण्यासाठी झटत असतात. मात्र असं असतानाही अनेकांच्या निराशाच हाती येते. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका तरुणीबद्दल सांगणार आहोत. जिनं एकाच वेळी चार परीक्षांचा फॉर्म भरला आणि चारही परीक्षेत अव्वल आली आहे.
अलीकडेच, कर्मचारी निवड मंडळ मध्य प्रदेशने विविध पदांसाठी गट-2 आणि उपगट-3 परीक्षेचे निकाल जाहीर केले, ज्यामध्ये कोलारस, शिवपुरी येथील नताशा लोधी हिने एकाच वेळी चार पदांवर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
प्रत्येक महिन्याला तब्बल 60,000 रुपये पगार तुमच्या खिशात; ‘या’ महापालिकेत परीक्षेशिवाय मिळेल जॉब
नताशाने मध्य प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळात केमिस्ट, मध्य प्रदेश मत्स्यपालन निरीक्षक, इंदूर दूध संघातील वरिष्ठ तंत्रज्ञ, आयुक्त अन्न सुरक्षा आणि नियंत्रक (अन्न आणि औषध प्रशासन, मध्य प्रदेश) मध्ये औषध विश्लेषक या चार पदांसाठी निवड यादी तयार केली होती. विशेष म्हणजे या चारही परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक तिनं पटकावला आहे.
नताशा लोधी ही शिवपुरीच्या प्रभाग-1 जगतपूर कोलारसमधील रहिवासी माजी नगरसेविका रामकुमारी नरेंद्र सिंह लोधी यांची मुलगी आणि ऑल इंडिया लोधी लोढा ऑफिसर-एम्प्लॉई युनियन ‘आलोक’ कोलारसचे ब्लॉक अध्यक्ष सुरेंद्र सिंह लोधी (शिक्षक) यांची भाची आहे. नताशा लोधीने नवोदय विद्यालय, पानघाटा (नरवार) येथे राहून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तर होळकर कॉलेजने 2022 मध्ये इंदूरमधून B.Sc उत्तीर्ण केले आहे.
Apple Store भारतात उघडलं तर पण इथल्या कर्मचाऱ्यांची सॅलरी किती असते माहितीये? आकडा बघून व्हाल थक्क
नताशा लोधीचे वय अवघे 21 वर्षे आहे. नताशाने फेब्रुवारीमध्ये चार परीक्षा दिल्या होत्या. या सर्वांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. नताशाने सांगितले की, तिने केवळ 3 महिन्यांच्या तयारीत चार परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. तसेच व्यवसायाने शिक्षक असलेल्या काकांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेची तयारी केल्याचे सांगितले. उच्च प्रशासकीय सेवेत जाण्याचे नताशाचे ध्येय असले तरी. आता ती यूपीएससीची तयारी करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.