मुंबई, 4 मे- जर तुम्ही सिनेमाप्रेमी असाल आणि बॉलिवूड स्टार्सबद्दल जाणून घेण्याबद्दल उत्सुक असाल तर नक्कीच तुम्ही देखील सोशल मीडियावर किंवा गुगलवर त्यांच्या बालपणीचे फोटो अनेकदा सर्च केले असतील. बॉलिवूड सेलेब्स अनेकदा त्यांचे न पाहिलेले फोटो त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असतात. आज तुमच्यासाठी एका अशा अभिनेत्रीचा फोटो घेऊन आलो आहोत, जो फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला खूप विचार करावा लागेल. विशेष म्हणजे या चिमुकलीला पाहून 99 टक्के लोक तिला ओळखणार नाहीत. कोण असेल ही अभिनेत्री असा प्रश्न सर्वांना पडला असेल.
बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे जी अतिशय सुंदर आहे आणि आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करत आहे. वडील जर्मन आणि आई बंगाली असलेली ही अभिनेत्री आजही मुस्लीम आडनाव धारण करते. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये एक वेगळं स्थान मिळवलं आहे. मात्र त्याचा हा प्रवास इतका सोपा नव्हता.
ओळखला का या अभिनेत्रीला?
दोन ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये दिसणारी ही चिमुकली एका फोटोत आपल्या आईकडे पाहून हसताना दिसते तर दुसऱ्या फोटोत ती एखादी व्यक्ती किंवा वस्तू पाहताना दिसत आहे. हा फोटो पाहून देखील ही अभिनेत्री अजून ओळखत नाही.. ही अभिनेत्री म्हणजे ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री दिया मिर्झा आहे.
वाचा-सई ताम्हणाकरचा वेस्टर्न ड्रेसमधये किंग अंदाज, वनपिसवरच्या पेटिंगनं वेधलं लक्ष
सावत्र वडिलांकडून मिळालं भरपूर प्रेम
दिया मिर्झाचा जन्म 9 डिसेंबर 1981 रोजी हैदराबादमध्ये झाला. ती फक्त 4 वर्षांची होती तेव्हाच ती वडिलांचपासून विभक्त झाली. खरं तर लग्नाच्या काही वर्षांनी तिचे वडील फ्रँक हॅंड्रिच आणि तिची आई यांच्यातील संबंध बिघडू लागले. आई-वडिलांचा घटस्फोट झाला तेव्हा दीया फक्त 4 वर्षांची होती. यानंतर तिच्या आईने अहमद मिर्झाशी लग्न केले आणि अहमद मिर्झाकडून दियाला वडिलांचे प्रेम मिळाले. मुलीच्या प्रेमापोटी तिच्या सावत्र वडिलांनी तिला त्यांचे आडनाव दिलं.
जेव्हा ती बनली मिस अशिया पॅसिफिक
‘दीवानापन’, ‘तुमको ना भूल पाएंगे’, ‘दम’, ‘परिणीता’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘संजू’ अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकलेल्या दिया मिर्झाने वयाच्या 18 व्या वर्षी मिस आशिया पॅसिफिकचा किताब जिंकला होता. आज ती मॉडेलिंग, अभिनय आणि चित्रपट निर्मितीबरोबरच समाजाच्या भल्यासाठी काम करते.
वैभव रेखीनसोबत केलं दुसरं लग्न
दीया मिर्झा आता 41 वर्षांची झाली आहे आणि आधीपेक्षा आता ती खूप चांगले काम करत आहे. तिचं पहिलं लग्न साहिल संघासोबत झालं होतं, पण लग्नाच्या 5 वर्षानंतर दोघे वेगळे झाले. दोन वर्षांपूर्वी 2021 मध्ये दीया मिर्झाने बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्न केले. त्याच्यापासून तिला एक मुलगा आहे, ज्याचे नाव अव्यान आहे. तिनं आपल्या मुलाचा एक कोलाज फोटो शेअर केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.