काही लोक जुगाड (Jugaad) आणि मेंदू लावून असे अनोखे काम करतात, ज्याद्वारे विश्वविक्रम होतो. पोलंड(Poland)मधील एका व्यक्तीने असेच काहीसे केले. त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) मध्ये नोंदवले गेले आहे. जगातील अनेक लोक त्यांच्या आश्चर्यकारक कामांसाठी ओळखले जातात. काही लोक जुगाड (Jugaad) आणि मेंदू लावून असे अनोखे काम करतात, ज्याद्वारे विश्वविक्रम होतो. पोलंड(Poland)मधील एका व्यक्तीने असेच काहीसे केले. या व्यक्तीने आपल्या कौशल्याने आणि जुगाडाच्या जोरावर असा पराक्रम केला आहे, की त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड(Guinness World Record)मध्ये नोंदवले गेले आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने शेअर केला व्हिडिओ
पोलंडच्या या व्यक्तीने जगातील सर्वात उंच सायकल बनवली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की या सायकलची उंची 24 फूट 3.73 इंच म्हणजेच 7.41 मीटर आहे. या माणसाचा पराक्रम इतका जबरदस्त आहे, की ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ने स्वत: त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्या व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Ref: TV9 Marathi