मुंबई, 13 मे : मुंबई इंडियन्सने शुक्रवारी होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर गुजरात टायटन्सला धूळ चारून तब्बल 27 धावांनी विजय मिळवला. आयपीएल 2023 मधील हा मुंबई इंडियन्सचा हा 7 वा विजय होता. परंतु असे असतानाच मुंबई इंडियन्सचा मेंटॉर असलेल्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याची प्रतिमा मालिन केल्याप्रकरणी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने गुरुवारी मुंबई सायबर गुन्हे शाखेत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सचिनच्या परवानगीशिवाय त्याचं नाव, फोटो आणि आवाजाचा वापर केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकरांचे वैयक्तिक सहाय्यक रमेश पारधे यांनी सचिनच्या वतीने ही तक्रार दाखल केली.
Access to trustworthy products is essential. Use the platform’s reporting and blocking tools to keep our communities safe. Let’s be proactive in creating a safer online environment. pic.twitter.com/JZR1FZTJtj
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 12, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.