दिल्ली, 21 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सने अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआरवर चार गडी राखून विजय मिळवला. दिल्लीचा हा यंदाच्या हंगामातील पहिलाच विजय ठरला. याआधी त्यांना सलग पाच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने निराशाजनक अशी कामगिरी केली. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले. दरम्यान, केकेआरचा अष्टपैलू क्रिकेटर आंद्र रसेलनं तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी केलेल्या विचित्र कृतीचीही सोशल मीडियावर चर्चा आहे.
केकेआरच्या डावाच्या १५ व्या षटकात दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादव हॅट्ट्रिकसाठी गोलंदाजी करत होता. तेव्हा उमेश यादव स्ट्राइकला होता. तर आंद्रे रसेल नॉन स्ट्रायकर एंडला होता. त्याने मैदानावर मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने पाहत फलंदाजी करत असल्याची कृती केली. यामुळे मैदानवर खेळाडूंसह प्रेक्षकही आश्चर्यचकीत झाले.
Kuldeep Yadav on a hat-trick.
Look at Andre Russell : pic.twitter.com/BqLlJEGxrD
— Rahul Sharma (@CricFnatic) April 20, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.