हैदर शेख, प्रतिनिधी
चंद्रपूर, 22 एप्रिल : चंद्रपूरचा ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अस्वलीच्या समोर एक बिबट्या उभा होता. पण, बिबट्याला पाहून अस्वलीने अशा प्रकारे तांडव केला की, बिबट्या जागेवरच उभा राहिला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
वन्यजीवांचे स्वतःचे असे एक विश्व आहे. यातील छोट्या- छोट्या गोष्टी अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले जंगलात धाव घेत असतात. चंद्रपूरचा ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे असेच एक समृद्ध वन्यजीव विश्व. या जंगलातील कोलारा बफर भागात स्वच्छंद विहार करत असलेल्या अस्वलीच्या पुढ्यात एक बिबट्या आल्यानंतर अस्वलीने घेतलेला पवित्रा मोठा आनंद देणारा ठरला आहे.
चंद्रपूरचा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बिबट्या आणि अस्वलीचा व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/ViFCDx7uE5
— News18Lokmat (@News18lokmat) April 22, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.