संतोषकुमार गुप्ता (बिहार), 28 एप्रिल : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडीलांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराचा खर्च आपल्याला भागवावा लागणार या भितीने मुलगा थेट पत्नीला घेऊन पळून गेला आहे. दरम्यान बराच वेळ मृतदेह घराच्या दारात तसाच पडून होता. हा प्रकार गावकऱ्यांना समजताच गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती देऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. ही घटना बिहारच्या छपरा जिल्ह्यातील बसधी गावातील आहे.
मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील बसधी गावातील रहिवासी राज कुमार सिंह हे फार पूर्वीपासून पाटणा येथील दिघा येथे नीरज कुमार सिंह यांच्या घरी काम करायचे. ते मजूर म्हणून काम करत असल्याने त्यांच गावी फार क्वचितच येणं-जाणं होतं. मुलगा आणि सून जेव्हाही पाटण्याला जायचे तेव्हा ते त्यांना भेटायचे आणि कमावलेले सगळे पैसे सोबत आणायचे.
भरदिवसा तरुणाचे शस्त्राने हातपाय धडावेगळे; तडफडत असूनही कोणीही केली नाही मदत
दरम्यान, मागच्या काही काळात राजकुमार सिंग यांची प्रकृती ढासळली, मात्र मुलगा आणि सून यांनी उपचारासाठी सहकार्य केले नाही आणि राजकुमार सिंग यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून त्यांच्या गावी आणल्याचे समजताच. मुलगा, सून आणि नातवाने घराला कुलूप लावून पळ काढला.
लग्नाच्या वेळी सांगितलं CBI अधिकाऱ्याचा PA; सत्य समजल्यानंतर रस्त्यातच राडा
हे पाहून गावकऱ्यांना धक्का बसला यानंत गावकऱ्यांनी पोलिसांना लेखी माहिती कळवत त्यांच्यावर अंत्ससंस्कार करण्याची मागणी केली. यानंतर मृतदेहावर अंतीम संस्कार करण्यात आले. गावकऱ्यांनी पळून गेलेला मुलगा व पत्नीविषयी संताप व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.