अभिषेक सिंह, प्रतिनिधी
गोरखपुर, 3 मे : आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. लोक मोठ्या आवडीने आंबा खातात. मात्र, यावेळी आंब्याच्या दराने मोठी झेप घेतली आहे. फळबाजारात आंब्याचा भाव 40 रुपये किलो आहे. त्याचवेळी किरकोळ विक्रीमध्ये दुप्पट दराने आंबा विकले जात आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरातील फळांच्या दुकानात आंबे दिसायला लागले आहेत. शास्त्री चौराहा, मोहाद्दीपूर तसेच धर्मशाळा कुडा घाट येथे असलेल्या फळांच्या दुकानांवर आंब्याच्या टोपल्या सजल्या आहेत.
सध्या गोरखपूरच्या फळ बाजारात दिसणारे आंबे आंध्र प्रदेशातील आहेत. कमी आयातीमुळे किरकोळ बाजारात त्याची किंमत 70 ते 80 रुपये प्रतिकिलो आहे. दरवाढीमुळे आंबा आता केवळ खास लोकांपर्यंतच पोहोचू लागला आहे. मे महिन्यात आंब्याची आवक बाजारात होईल, असा व्यापाऱ्यांचा विश्वास आहे. यामुळे त्याची किंमत कमी होईल. सध्या कमी आयातीमुळे आंब्याच्या दर वाढले आहेत.
बाजारात 45 प्रकारचे आंबे उपलब्ध –
घाऊक फळे समितीचे सरचिटणीस विजय सोनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात 45 प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत. मे महिन्यात आवक वाढणार असल्याने सर्व प्रकारचे आंबे बाजारात उपलब्ध होतील. आंब्याची चव, आकार आणि रंग वेगवेगळा असतो. ग्रामीण भागातही भरपूर आंबे असतील. आंबा उत्पादक क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर कॅम्पियरगंज, बलरामपूर, बाराबंकी, रुदौलीचा दसरी, लंगडा गवरजीत आदी आंब्यांच्या जाती उपलब्ध होतील. सध्या बाजारात मिळणारे आंबे केमिकलने पिकलेले आहेत. हे आरोग्यासाठी अपायकारक आहे, त्यामुळे लोकांनी सध्या आंबा खाणे टाळावे.
न्यूज 18 शी बोलताना फिजिशियन डॉ. बी. के. सुमन यांनी सांगितले की, आंबा कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. हे खूप हानिकारक आहे. त्यावर बंदी आहे, पण तरीही व्यापारी झटपट नफा कमावण्यासाठी त्याचा वापर केला जातो. म्हणूनच आरोग्य बिघडू नये, यासाठी सध्या आंबा खाणे लोकांनी टाळायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.