असिफ मुरसल, प्रतिनिधी
सांगली, 15 एप्रिल : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहेत. तसेच आत्महत्येच्याही घटना सातत्याने समोर येत आहे. लेस्बियन मैत्रीणिच्या छळाला कंटाळून नागपुरातील एका तरुणीने आत्महत्या केल्याचा खुलासा नुकताच पोलिसांनी केला होता. त्यानंतर आता सांगलीच्या जतमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली वाहत तरुणाने आत्महत्या केली. जत तालुक्यातील येळवी गावातील या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
तुमच्या शहरातून (सांगली)
काय आहे संपूर्ण प्रकरण –
जत तालुक्यातील येळवी येथे एका 22 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर स्वतःचा फोटो टाकत आत्महत्या केली. भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत शेतातील घरी गळफास घेवून त्याने आपले जीवन संपविले. औदुंबर विजय जगताप असे आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
येळवी येथील 22 वर्षीय औदुंबर विजय जगताप याचे घर येळवी गावापासून काही अंतरावर आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता औदुंबर जगताप याने स्वतःच्या व्हॉट्सअपला स्वतःचा फोटो स्टेटसला ठेवला. स्टेटस ठेवल्यानंतर काही वेळानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक तपास जत पोलीस करत आहेत.
गावात सुरूये अशी चर्चा –
आत्महत्येच्या आदल्या दिवशी औदुंबर याचं आणि त्याच्या आईचं कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यातून औदुंबरने आपल्या आईला बेदम मारहाण केली होती. तसेच आईला मारहाण केल्यानंतर औदुंबरच्या मामाने औदुंबरच्या आईला जत येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. जतमधील रुग्णालयामध्ये औदुंबरच्या आईवर उपचार सुरू असताना त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आईला मारहाण केल्याच्या पश्चातापातून त्याने ही आत्महत्या केली असावी, अशी चर्चा गावात सुरू आहे.
नांदेडमध्येही घडली होती भयानक घटना –
नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर घडला. आजार आणि कर्जाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. 30 वर्षीय महिलेने आपल्या 13 वर्षीय मुलासमोरच हे टोकाचं पाऊल उचलले. मीनाबाई पंजाबराव मेने (वय 30) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना मागच्या महिन्यात घडली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.