बब्बू शेख, प्रतिनिधी
नांदगाव, 17 मे : राग अनावर झाला की माणूस काय करेल याचा नेम नाही. अशीच एका घटना नाशिकच्या नांदगाव शहरातील आनंद नगर भागात घडली आहे. मावस भावाने मामा, मामीला मारझोड करून घराच्या बाहेर हाकलून दिल्याच्या कारणावरून तरुणाने आपल्या मावास भावाच्या डोक्यात हातोडीने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगावच्या आनंदनगर भागात ही खळबळजनक घटना घडली आहे. वाल्मिक ठाकूर असं मयताचे नाव आहे. तर ईश्वर ठाकूर आरोपीचे नाव आहे. आरोपी हा एका शाळेत मुख्याध्यापक आहे. वाल्मिक हा दारू पिऊन नेहमी आई, वडिलांसोबत भांडण करायचा. मंगळवारी रात्री वाल्मिक आणि त्याच्या आई-वडिलांमध्ये कुठल्या तरी कारणावरून भांडण झालं. त्यानंतर रागाच्या भरात त्याने आई वडिलांना मारझोड केली आणि त्यांना घराबाहेर हाकलून दिलं होतं.
तुमच्या शहरातून (नाशिक)
घरात मारहाण झाल्याची बाब आरोपी ईश्वर ठाकूर याला समजली. ते कळताच ईश्वर हा त्याला समजविण्यासाठी त्याच्या घरी गेला असता दोघांमध्ये वाद झाला. त्याने त्याची समजूत काढली पण तो काही ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर रागाच्या भरात ईश्वरने वाल्मिकच्या डोक्यावर हातोडीने जोरदार प्रहार केला. वाल्मिक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून ईश्वर फरार झाला. शेजाऱ्यांनी वाल्मिकला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. फरार झालेल्या ईश्वरला पोलिसांना काही तासात अटक करून त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
70 वर्षांच्या बापाची धारदार शस्त्राने वार करून हत्या
दरम्यान, शेतीमध्ये हिस्सा आणि पैसे देत नसल्यामुळे संतापलेल्या मुलाने आपल्या 70 वर्षांच्या वडिलांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. रिसोड तालुक्यातील वाडी वाकद परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. भगवानबाबा संस्थान इथे वास्तव्यास असणाऱ्या आत्माराम मुंढे यांच्यासोबत त्यांचा मुलगा संजय मुंढे यांचं काल रात्री शेतीमधील हिस्सा आणि पैसे देण्यावरून भांडण झालं.
(अल्पवयीन प्रियकराचा भीषण सूड, मित्राने प्रेयसीशी वाढवला संपर्क अन् घडलं भयानक)
बाप आणि मुलामधला वाद कुटुंबातील सदस्यांनी सोडवला, मात्र संजय मुंढेच्या डोक्यात राग घुसलेला असल्याने त्याने भगवानबाबा मंदिर परिसरामध्ये झोपलेल्या वडिलांवर तीक्ष्ण वस्तूने वार करून हत्या केली. वडिलांची हत्या केल्यानंतर मुलगा संजय मुंढे गावातून पळून गेला होता, मात्र रिसोड पोलिसांनी त्याला पकडले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.