अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा, 11 मे: ऐंशी पार आजोबा म्हटलं की आपल्यासमोर हलणाऱ्या हातात कपबशी आणि काठी घेऊन चालणारी व्यक्ती असाच काहीसा चेहरा सामोर येतो. मात्र वर्धा येथील 84 वर्षीय आजोबांनी हा दृष्टिकोन साफ चुकीचा ठरवला आहे. एकेकाळी पोलीस सेवेत असणारे जानराव खुशालराव लोणकर हे एकामागून एक विक्रम आपल्या नावे करत आहेत. देशविदेशातील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत त्यांनी आतापर्यंत 114 पदके मिळवली आहेत. विशेष म्हणजे तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा उत्साह कायम असून ते विविध स्पर्धांत सहभागी होत असतात.
लोणकर यांनी पटकावली 114 पदके
तुमच्या शहरातून ( वर्धा)
जानराव लोणकर हे 84 वर्षांचे असून त्यांची या वयातील कामगिरी प्रेरणादायी आहे. लोणकर आजोबांनी आतापर्यंत दौड स्पर्धा, भालाफेक, गोळाफेक, तबकडी फेक, जम्पिंग, ट्रिपल चेस्ट, हार्डर यांसारख्या विविध प्रकारच्या 26 ते 27 खेळ स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धांमध्ये त्यांनी केवळ सहभागच घेतला नाही तर तब्बल 114 मेडल्स प्राप्त केलेत. भारतातच नाही तर विदेशात जाऊनही त्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
कशी असते दिनचर्या?
लोणकर हे सुरवातीपासून आरोग्याची काळजी घेतात. लवकर उठणे, व्यायाम करणे, वेळेत जेवण करणे, लवकर झोपणे, यासारख्या सवयी त्यांनी अंगिकारल्या आहेत. निरोगी आणि फिट आयुष्य जगण्याचे काही महत्त्वपूर्ण नियम लोणकर आजोबा कटाक्षाने पाळतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या ते अगदी तंदुरुस्त असून इतरांना प्रेरणा देत आहेत. त्यांच्या 81 वर्षीय पत्नी सुमन जानराव लोणकर याचं आजोबांना प्रत्येक कार्यात सहकार्य असतं.
Inspiring Story: बैलगाडी उलटली, दोन्ही पाय गेले, पण सचिन थांबला नाही, जिद्दीची अनोखी कहाणी, Video
पोलीस अधिकारी म्हणून सेवा
जानराव लोणकर हे वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी पोलीस खात्यात रुजू झाले. विविध पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी पोलीस अधिकारी पदाची भूमिका बजावली. त्यानंतर 48 व्या वर्षी सेवानिवृत्ती घेतली. वयाची तब्बल 80 वर्षे पार केल्यावरही भारतातील कानाकोपऱ्यात तसेच विदेशातही क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची त्यांना आवड आहे. सध्याच्या मोबाईलवर गेम खेळण्याच्या काळात मैदानी दौड करणाऱ्या आजोबांची प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.