आज जर राज्यात लोकसभा निवडणूक झाल्या तर महायुतीच्या जागा घटणार असल्याचे चित्र इंडिया टुडे सी वोटर च्या ताज्या सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. या सर्वेक्षणात मतदारांचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप शिंदे गट अजितदादा गट यांची चिंता वाढली आहे. एका बाजूला सत्ताधारी चिंतेत तर विरोधी पक्ष आनंदात असल्याचे चित्र आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याने जो सत्तांतराचा खेळखंडोबा पाहिला त्याने जनता सत्ताधाऱ्यांवर प्रचंड नाराज असल्याचे या सर्वेक्षणातून आढळून आले आहे. निवडणुकांपूर्वी जनतेने आपली नाराजी एक प्रकारे सुर्वेक्षणातून व्यक्त केली आहे .या सर्व्हेक्षणात लोकसभेत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचे आराखडे मांडले आहेत ते पुढील प्रमाणे माविआ -२८ ठाकरे गट +एनसीपी =१८ काँग्रेस -१० महायुती -२० भाजप-१५ अजित दादा + शिंदे गट -५ अशी स्तिथी यात वर्तविलेली दिसते . पक्षांतराचे राजकारण मोदींची घटती लोकप्रियता प्रस्थापितांविरोधात असलेली मतदारांची मानसिकता हे सर्व घटक या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहेत.
पेट्रोल दरवाढ बेरोजगारी यांनी सामान्य माणूस तर कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला दर नसल्याने सरकारवर नाराज आहेत. कांद्यावरचा निर्यात शुल्क ४० टक्के करण्याच्या सरकारच्या तुघलकी निर्णयाने त्यात आणखीनच भर घालण्याचे काम केले आहे. इंडिया टुडे चे आत्तापर्यंतचे एग्झिट पोल बरोबरच आले असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणूका ह्या सत्ताधाऱ्यांची मागील निवडणुकांप्रमाणे सोप्या नसल्याचे चित्र आहे. सत्ताधारी दरवेळेसारखे मोदी यांच्या करिष्म्यावर अवलंबून आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकांत शरद पवार राहुल गांधी उद्धव ठाकरे मोठ्या त्वेषाने प्रचारात उतरणार असल्याचे चित्र दिसत आहे विधान सभेत वडेट्टीवारांसारख्या आ क्रम नेत्याची निवड करून काँग्रेसने आपली चाणक्य नीती दाखवून दिली आहे वडेट्टीवार सरकारला प्रत्येक प्रश्नावर घेरत असून फडणवीसांना त्यांच्या विदर्भात त्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे पवारांनी जर शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले तर सत्ताधाऱ्यांना मतदार बाहेरचा रास्ता दाखवल्याशिवाय राहणार नाहीत हे दिसून येत आहे.भाजप विरोधात Anti-incumbency फॅक्टर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत देशाने पाहिला तो लोकसभेतही दिसू शकतो. त्यामुळे आगामी निवडणूक भाजप व त्याच्या मित्रपक्षांना सोप्या नसल्याचे चित्र राज्यात आहे