रत्नागिरी, 30 एप्रिल : राज्यात सध्या बारसू रिफायनरीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र दुसरीकडे तरीही जमिनीचे सर्वेक्षण सुरूच असल्यानं स्थानिक नागरिक आक्रमक बनले आहेत. पोलीस आणि स्थानिकांमध्ये अनेकदा वादावादी देखील झालीये. या प्रकल्पाला विरोध वाढत असल्यानं आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार यांची भेट घेणार आहे. या भेटीत बारसू रिफयनरीवर चर्चा होणार आहे.
सामंतांची माहिती
दरम्यान या भेटीबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. उद्या साडेतीन वाजता शरद पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बारसू प्रकल्पाबाबत आम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. शेतकऱ्यांच्या अडणी दूर करण्यासाठी आम्ही शरद पवार यांना भेटणार आहोत. या बैठकीला जिल्हाधिकारी आणी पोलीस अधीक्षक देखील असतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
शहांसोबत चर्चा
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी अमित शाह आणि त्यांच्यामध्ये आमदार पराग अळवणी यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी चर्चा झाली. तब्बल पाऊण तास ही चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशावर झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे ही चर्चा मुंबई महापालिका निवडणुकीवर झाली आहे. मात्र सध्याचं राजकीय वातावरण पहाता या बैठकीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.