मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरवर 5 विकेट्सने विजय मिळवून यंदाच्या आयपीएल मधील सलग दुसरा सामना जिंकला. परंतु हा सामना मुंबई इंडियन्ससाठी सर्वाथाने खास ठरला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रिलायन्स फाउंडेशनकडून ‘इसए डे’ साजरा करण्यात आला असून यावेळी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला सपोर्ट करण्यासाठी 19 हजार मुली उपस्थित होत्या.
वानखेडेवर साजरा करण्यात आलेला इसए डे हा यंदा मुलींना समर्पित करण्यात आला होता. यानिमित्ताने स्टेडियमवर उपस्थित असलेल्या रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन आणि मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी म्हणाल्या, “येथे उपस्थित हजारो मुलींचा उत्साह पाहून मी अगदी भारावून गेले आहे. इसए सामने नेहमीच खास असतात. या वर्षी, आमच्याकडे वेगवेगळ्या एनजीओच्या 19 हजार मुली स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. त्यापैकी अनेकजणी पहिल्यांदाच थेट स्टेडीयमवर क्रिकेट सामना पाहत आहेत. आम्हा सर्वांसाठी हा खूप भावनिक दिवस आहे”.
“आजचा सामना क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या सेलिब्रेशनचा आहे. मला हे अधोरेखित करायचे होते की मुलींना शिक्षण आणि खेळ या दोन्हीचा अधिकार आहे. मला आशा आहे की या सर्व मुली आपल्या स्वप्नांचे अनुसरण करून भविष्यात त्यांना हवे ते ध्येय साध्य करतील. आज आम्ही त्या सर्वांना फक्त प्रेरणा मिळावी आणि कोणतीही गोष्ट साध्य करण्याची हिंमत मिळावी यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
नीता अंबानी पुढे म्हणाल्या की, “आज या स्टँडमध्ये बसलेल्या काही मुली उद्याच्या सुपरस्टार होऊ शकतात. इथे उद्याची झुलन किंवा हरमनप्रीत असू शकते फक्त क्रिकेटच नाही तर भविष्यात कोणत्याही खेळातील सुपरस्टार या मुलींमध्ये दडलेली असू शकते. त्या जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात आणि भारताच नाव अधिक उंचावू शकतात”.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.