पुणे, 8 मे, रायचंद शिंदे : आज माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छापण्यत आलेल्या पत्रिकेत ठाकरे गटाच्या नेत्यांसह सर्वपक्षीय नेत्यांची नावं टाकण्यात आली आहेत. मात्र या पत्रिकेत खासदार अमोल कोल्हे आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं नाव नसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
सर्व पक्षीय नेत्यांची नावं
तुमच्या शहरातून (पुणे)
शिवारीराव आढळराव पाटील यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले होते. मात्र आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त छापण्यात आलेल्या पत्रिकेत ठाकरे गटाच्या नेत्यांची नाव देखील आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांसोबतच इतर सर्व पक्षीय नेत्यांची नाव देखील या पत्रिकेत आहेत. मात्र या पत्रिकेत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यात आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.