मुंबई, 1 मे : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईच्या बीकेसी मैदानात महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी तीनही पक्षांचे नेते व्यासपीठावर दाखल व्हायला सुरूवात झाली, तेव्हा बोलकं चित्र पाहायला मिळालं. अजित पवार स्टेजवर दाखल झाले तेव्हा त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या नेत्यांना हस्तांदोलन केलं. शिवसेनेचे नेते संजय राऊतही वज्रमूठ सभेच्या स्टेजवर होते. अजितदादांनी संजय राऊतांना हस्तांदोलन केलं, पण दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाळलं. एवढच नाही तर हस्तांदोलन केल्यानंतर संजय राऊतांनी अजितदादांकडे बघणंही टाळलं.
काहीच दिवसांपूर्वी अजितदादा आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाद झाला होता. सामनाच्या अग्रलेखामधून संजय राऊत यांनी राष्ट्रवादीमध्येही शिवसेनेसारखा प्रयोग होऊ शकतो, असं म्हणत अजित पवारांकडे अंगुली निर्देश केले होते. केंद्रीय यंत्रणांचा दबाव निर्माण करून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर याबाबत लिहिल्यामुळे अजित पवार सत्तेत सहभागी होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या.
मुंबईमध्ये महाविकासआघाडीची वज्रमूठ सभा, अजित पवार-संजय राऊत समोरासमोर येताच काय झालं?#MahavikasAghadi #AjitPawar #SanjayRaut pic.twitter.com/i1ewHiZx1T
— News18Lokmat (@News18lokmat) May 1, 2023
तुमच्या शहरातून (मुंबई)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.