पुणे, 29 मार्च : भाजपचे नेते गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कसबा पोटनिवडणुकीमध्ये गिरीश बापट यांची हजेरी लावली होती. प्रकृती अस्वस्थ्यामुळे बापट हे व्हिलचेअरवर आले होते. त्यांचे हात थरथर कापत होते. त्यांना पाहून सर्वच कार्यकर्ते स्तब्ध झाले होते.
मागील महिन्यात पुण्यात कसबा पोटनिवडणूक पार पडली. प्रकृती अस्वस्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे अखेर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार गिरीश बापट व्हिलचेअरवर सहभागी झाले होते.
तुमच्या शहरातून (पुणे)
गिरीश बापट यांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण देत कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचे सांगितलं होतं. मात्र, कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई सुरू असल्याने गिरीश बापट आजारपण बाजुला सारून आपल्या पक्षासाठी प्रचाराच्या मैदानात उतरले होते.
(Girish Bapat Death : स्वयंसेवक ते खासदार, लढवय्या गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास)
आजारपणाच्या कारणास्तव मी घरोघरी जाऊन प्रचार करु शकत नाही, असे पत्रक गिरीश बापट यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले होते. गेल्या तीन महिन्यांपासून प्रकृती अस्वस्थ्येमुळे मी खूप कमी काम केले आहे. तरीसुद्धा आजघडीला मला आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे.
((Girish Bapat : भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन)
त्यामुळे सध्या डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला. परिणामी मी कसबा पोटनिवडणुकीसाठी घरोघरी जाऊन प्रचार करु शकत नाही, असं बापट म्हणाले होते, हेच त्यांचे शेवटचे शब्द होते.
अमित शहांनी घरी जाऊन घेतली होती बापट यांची भेट
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांचा तब्येतीची चौकशी केली केली. गिरीश बापट हे आजारी असताना देखील पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचारासाठी आल्यामुळे विरोधकांनी भाजपवर टीका देखील केली आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी बापट यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.