मुंबई, 01 मे : हे घटनाबाह्य सरकार बसले थोड्या दिवसांचा खेळ आहे, हे सरकार कोसळणार म्हणजे, कोसळणारच आहे. या मंत्रिमंडळात महिला नाही, अस्सल मुंबईकर नाही. दुसरं कुणी दिसला आहे का? ना मुंबईचा आवाज आहे, ना पुण्याचा आवाज आहे. ना कोणत्या शेतकऱ्यांचं आवाज आहे, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेत पहिलचं भाषण आदित्य ठाकरेंनी केलं. यावेळी बोलत असताना आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर जोरदार घणाघात केला.
तुमच्या शहरातून (मुंबई)
‘महाविकास आघाडीच्या काळात कुठेही दंगल झाली नाही, प्रत्येक जिल्हा असेल, प्रत्येक पालकमंत्री हा आपल्या जिल्ह्याची कामं आणि काळजी करत होता. हे घटनाबाह्य सरकार बसले थोड्या दिवसांचा खेळ आहे, हे सरकार कोसळणार म्हणजे, कोसळणारच आहे. या मंत्रिमंडळात महिला नाही, अस्सल मुंबईकर नाही. दुसरं कुणी दिसला आहे का? ना मुंबईचा आवाज आहे, ना पुण्याचा आवाज आहे. ना कोणत्या शेतकऱ्यांचं आवाज आहे. हे सरकार बिल्डर आणि कंत्राटदारांचं सरकार आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी सरकारवर केली.
(…आणि अजितदादा स्टेजवर आले, समोर संजय राऊत उभे, नेमकं काय घडलं? Video)
‘जी कर्जमुक्ती आपल्या सरकारमध्ये झाली होती, ती मिळाली की नाही, ते प्रत्येक शेतकरी सांगत आहे, कर्जमाफी मिळाली आहे. अवकाळी पाऊस झाला तेव्हा साडेदहा हजार कोटींची मदत दिली होती. पण आता हे अवकाळी सरकार बसले आहे. गारपीट होत आहे, अवकाळी पाऊस होत आहे, पण मदत करणारे कुणीही नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर केली.
‘सुप्रिया सुळे यांना शिवी देणारे गद्दार मंत्री अजूनही गद्दार आहे, त्यांची हकालपट्टी झाली नाही. सुषमाताईंना वेडंवाकडं बोलणाऱ्या आमदारांची हकापट्टी झाली नाही. जर या लोकांबद्दल कारवाई होत नसेल तर इतर महिलांचं काय आहे, असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला.
(त्या बारचं सीसीटीव्ही चेक करा, फडणवीसांना पत्र लिहून राऊतांचा खळबळजनक आरोप)
‘टाटा एअर बस, वेदांत फॉक्सकॉन गेला कुठे गुजरातला, आता 40 गद्दार गेले कुठे, सुरतलाच गेले आहे. मी एक अग्रलेख लिहिला आहे, उद्या तो दैनिकांमध्ये छापून येणार आहे, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
‘महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे हे कुटुंब प्रमुख म्हणून काम करत होते. त्यावेळी अजितदादा, बाळासाहेब थोरात असतील आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो. या कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला जपलं, जून 2020 पासून ते 2022 आपण राज्यात साडे सहा लाखांची गुंतवणूक राज्यात आणली, असा दावाही आदित्य ठाकरेंनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.