पुणे, 31 मे : महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र अद्यापही जागा वाटपावरून मविआत एक मत होत नसल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून 18 जागांवर दावा करण्यात आला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा प्रस्तावर ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आता यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणती जागा कोण लढेल याचा आढावा शरद पवारांनी घेतला आहे. त्या मतदारसंघात असलेली पक्षाची आणि उमेदवाराची ताकद जागा वाटप करताना लक्षात घेतली जाईल, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले आव्हाड?
जितेंद्र आव्हाड यांनी महाविकास आघाडीतील लोकसभेच्या जागा वाटपावर प्रतिक्रिया दिली आहे. हाविकास आघाडीमध्ये कोणती जागा कोण लढेल याचा आढावा शरद पवारांनी घेतला आहे. त्या मतदारसंघात असलेली पक्षाची आणि उमेदवाराची ताकद जागा वाटप करताना लक्षात घेतली जाईल. पराभव कोणाचा करायचा हे ठरवून केलं जाऊ शकतं. मात्र जिंकून कोण येईल त्याला ताकद द्यावी लागणार आहे. मविआतील जागा वाटपावर मोजक्या लोकांनी बोललं पाहिजे. यातून आता शरद पवारच मार्ग काढलीत, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसेच सर्व्हेनुसार आमच्या 36 जागा निवडून येतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
सत्तासंघर्षावर प्रतिक्रिया
यावेळी बोलताना त्यांनी सत्तासंघर्षाच्या निकालावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टानं जे सांगितलं आहे, त्यानुसारच विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय घ्यावा लागेत असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. संविधानाचा आदर ठेवायचा असेल तर 90 दिवासांच्या आत निर्णय घ्यावा लागेल असंही ते म्हणाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.