मुंबई, 27 एप्रिल : आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. तव्यावरची भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर करपते, त्यामुळे भाकरी फिरवण्यास विलंब करून चालणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आयोजित युवा मंथन कार्यक्रमात बोलत होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यामधून राष्ट्रवादीमध्ये पुढील काळात मोठ्या बदलाचे संकेत दिसून येत आहेत. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाणा आलं आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार ?
तुमच्या शहरातून (मुंबई)
आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. तव्यावरची भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर करपते, त्यामुळे भाकरी फिरवण्यास विलंब करून चालणार नाही. समाजात काही व्यक्तिंना पद असो अथवा नसो मात्र त्यांना कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीमध्ये बदलाचे संकेत?
शरद पवार यांनी हे वक्तव्य मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आयोजित युवा मंथन कार्यक्रमात केलं आहे. त्यामुळे पवारांच्या या वक्तव्यानंतर आगामी काळात राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल पहायला मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पवार यांचा या वक्तव्यामागे आणखी काही उद्देश आहे का? याची देकील जोरदार चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.