पुणे, 21 एप्रिल : ‘अमुक जागा मिळणार आहे. आता अमुक कशाला, असं लपुन छपून बोलण्यात काही अर्थ नाही. अजितदादा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बसणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेला नक्कीच वाटतंय, नव्या उमेदीचा, 21 व्या शतकातील तिसरं दशक सुरू आहे, एक गतीमान मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहायला मिळावा. कमिटेमेंट पाळणार, मुख्यमंत्री मिळावा, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे.
पुण्यात दैनिक सकाळ समुहाच्या वतीने अजित पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलत असताना सुनील तटकरे यांनी थेट मुख्यमंत्रिबद्दल विधान केलं आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
आसामच्या खासदारांनी मला विचारलं, महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे. अजित पवारांच्या मनात काय चाललं आहे. मला त्यावेळी कळलं आहे, शरद पवार यांच्या आशीर्वादासह नेतृत्व आता देशपातळीवर पोहोचलं आहे. याचा अनुभव तिथे आला आहे. मला विश्वास आहे, मगाशी अशोक बापे म्हणाले की, त्याप्रमाणे विशिष्ट जागा, अमुक जागा मिळणार आहे. आता अमुक कशाला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बसणार आहे. असं लपून छपून बोलण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्राच्या जनतेला नक्कीच वाटतंय, नव्या उमेदीचा, 21 व्या शतकातील तिसरं दशक सुरू आहे, एक गतीमान मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहायला मिळावा. कमिटेमेंट पाळणार मुख्यमंत्री मिळावा, असं सुनील तटकरे म्हणाले.
तसंच, मला अनेक नेत्यांचा सहवास मिळाला, स्वर्गीय वसंतदादा, शंकराव चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांसोबत काम केलं. पहिल्यांदा दादांची भेट झाली तेव्हा कळलं मॅन ऑफ कमिटमेंट…एकच वादा अजितदादा ही ओळख नंतर झाली, पण शब्दाला पक्का असणार माणूस म्हणजे अजित पवार आहे, अशी स्तुतीसुमनंही तटकरेंनी उधळळी.
मी विधिमंडळात आलो, 95 ते 99 पर्यंत प्रवास केला. त्यावेळी अजितदादा विधिमंडळात होते. 95 पासून त्यांच्यासोबत प्रवास केला. 1999 ला राष्ट्रवादी स्थापन झाली. शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली, त्यावेळी त्यांनी मुंबई पाठवलं. त्यावेळी मुंबईतील मनोहर आमदार निवासात अजित पवारांची भेट झाली. तासभर चर्चा झाली. 1999 विधानसभा निवडणुकीत कर्जतमध्ये माझा सहकारी सुरेश लाड यांना उमेदवारी मिळावी असा आग्रह धरला. पक्षाच्या निर्णयाआधी घेतली. मतदानाचा अर्ज भरण्याआधीपर्यंत थांबलो होते. पण अजितदादांनी दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला, असा किस्साही तटकरेंनी सांगितली.
‘अजितदादा घरी आल्यावर सगळ्यांना काळजी पडले, मोठे साहेब आल्यावर एवढी काळजी वाटत नाही. पण अजितदादा आल्यावर कुठल्या विषयात कोणती चूक निघेल याचा भरवसा नाही. त्यामुळे सगळ्यांनाच शासकीय, कुटुंबीय किंवा कोणताही कार्यक्रम असला तरी तो अजितदादांच्या वेळेनुसारच असतो, असंही तटकरेंनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.