नवी दिल्ली, 14 मे : मोठी बातमी समोर येत आहे. 2024 च्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून भाजपला पर्याय देण्यासाठी एक मजबूत मोट बांधण्यात येत आहे. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यानंर आज आदित्य ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.
केजरीवालांचं ट्विट
आदित्य ठाकरे यांच्या भेटीबाबत अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. आज माझ्या निवासस्थानी आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. त्यांचं आदरातिथ्य करण्याची संधी मला मिळाली. यावेळी देशात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी मुंबईमध्ये मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
तुमच्या शहरातून (मुंबई)
आज अपने आवास पर श्री आदित्य ठाकरे जी के आतिथ्य का अवसर मिला। देश के वर्तमान राजनीतिक घटनाक्रम को लेकर उनसे विस्तार से बातचीत हुई। @AUThackeray pic.twitter.com/2VlHJSquDB
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 14, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.